बांधकाम सुरू असलेल्या दुमजली भिंतीचा काही भाग सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीवर कोसळला

यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी : बांधकाम सुरू असलेल्या दुमजली इमारतीच्या प्लास्टरचे काम सुरू असताना भिंतीचा काही भाग बाजूला असलेल्या सिमेंटच्या पत्र्याच्या खोलीवर कोसळला. यात दोन जणांचा मृत्यू झाला.तर, दोन जण जखमी झाले. ही घटना मोशी येथील तापकीरनगर येथे साईकृपा कॉलनीमध्ये गुरूवारी (दि. १५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.

उत्तम नारायण मोरे (वय ३३, रा. साई कॉलनी, तापकीरनगर, मोशी) आणि मेहबूब (वय ३०) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. एमआयडीसी भोसरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईकृपा कॉलनीमध्ये तात्याराव बाबुराव जाधव यांचे घर आहे. या घराच्या वरच्या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. गुरूवारी भिंतीचे प्लास्टर सुरू होते.

यावेळी अचानक भिंतीचा काही भाग कोसळला. ही भिंत बाजूला असलेल्या एका खोलीच्या सिमेंटच्या पत्र्यावर पडली. यावेळी उत्तम आणि मेहबूब यांच्यासह आणखी दोन जण खोलीत बसले होते. भिंत पडून जखमी झाल्याने उत्तम आणि मेहबूब यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post