मुक्त सैनिक सोसा.ची ६१ वी वार्षिक सोसायटी सभा आदर्श विद्या मंदिर येथे पार पडली

सदर मीटिंग मध्ये उपस्थित असलेल्या काही सभासदांनी १-१३ विषयावर विरोध दर्शवला.

प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी: मुक्त सैनिक सोसा.ची ६१ वी वार्षिक सोसायटी सभा दिनांक २५-९-२०२२ दुपारी १२ वा आदर्श विद्या मंदिर येथे पार पडली सदर मीटिंग मध्ये सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमन,संचालक मंडळ व सचिव यांना समर्पक उत्तर देता आलेले नाही तसेच झालेल्या चुका मान्य कबूल केल्या. संचालक मंडळ व सचिव यांच्या मनमानी कारभार मुळे सोसायटी च्या झालेल्या नुकसानीस ते  जबाबदार आहेत असे आरोप सभादांच्यावतीने विजय मलाबादे व चंद्रकांत अनुरकर यांनी केले

सदर मीटिंग मध्ये उपस्थित असलेल्या काही सभासदांनी १-१३ विषयावर विरोध दर्शवला.

सदर मीटिंग साठी संचालक मंडळ यांच्याकडून पोलिस बंदोबस्त तसेच बाउन्सर यांची सभेसाठी नेमणूक करून तत्कलाईन संचालक मंडळ यांचा माजी सैनिक सभसदाबद्दल विश्वास गमावलेले आहे. बाउन्सर चा  वापर करून सभासदावर दबाव यंत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला.सदर मीटिंग दिवशी सोसायटीचा सभासदांचे वारस यांनी संचालक मंडळ यांच्या विरोधात शांततेन निदर्शनं केले. सोसायटी चे सभासद व वारस यांनी संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत उपनिबंधक सहकारी संस्था हातकणंले दिनांक १९-९-२०२२ रोजी निवेदन दिले असून यांची अमलबावणी करण्यात यावी याबाबत दिलेले निवेदन सर्व सभदाना न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली. सदर मीटिंगवरून असे दिसून येते की संचालक मंडळाचा कारभार बरखास्त करून लवकरात लवकर निवडणूक घेण्यात यावी अशी परिस्थिती दिसून येत आहे. यावेळी उपस्थितीत सभासद विजय मलाबदे चंद्रकांत अनुरकर रवींद्र शिंगाडे अलगोंडा पाटील किसन अलुगडे, पट्टण मॅडम, शंकर लिपरे श्रीकांत सांगावकर, सुनील म्हेत्रे, रमेश बेडगे, औताडे वहिनी, यास अनेक सभासद हजर होते. मीटिंगच्या बाहेर यांचे.न्याय व हक्कासाठी सभासदाचे वारसदार यांचे ठिया व धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये मुकुंद शेंडगे,सादिक बागवान,आकाश अलूगडे, प्रवीण डोंगरे, संतोष डांगरे, संतोष पाटील केतन कोळेकर,भानुदास तासगावे,सचिन तासगावे, प्रशांत अवताडे,राहुल ढपले, सचिन बेडगे,मनोज उणवूने, प्रदीप कुंभार, अजित कटारिया,दिलावर शेख, प्रमोद जाधव,प्रशांत अनुरकर, बहुसंख्य वारसदार हजर होते..

Post a Comment

Previous Post Next Post