प्रेस मीडिया लाईव्ह
इचलकरंजी प्रतिनिधी- :
बळीराजा कृषी विज्ञान मंडळ तारदाळ यांचेवतीने विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या मान्यवरांची "सन्मान पुरस्कार २०२२" करिता नुकतीच निवड करण्यात आली आहे.
सदर पुरस्कारसाठी निवड करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये- दस्तगीर बाणदार,रुई- समाजरत्न; भास्कर खांडेकर,कबनूर- समाजिक कार्य; संदीप पाटील,कोल्हापूर- कलाभुषण; लालचंद पारिक,इचलकरंजी- सर्वोत्कृष्ट नि. व्यवस्थापक; जादुगार- रमेश बरडे,खोतवाडी- कला विभुषण; सखाराम जाधव,शिरदवाड- कला भुषण; शिवाजी येडवान,माणकापूर- निसर्ग मित्र; दिलीप मजलेकर,आळते- सहाय्यक दिग्दर्शक; कवि- साताप्पा सुतार,हुपरी- वृक्ष मित्र; बाबुराव ढेंगे,इचलकरंजी- कला भुषण; वसंत कांबळे,पट्टणकोडोली- उत्कृष्ट गायक; बजरंग कांबळे,शहापूर- कला सम्राट; वैद्य- सचिन बेलेकर,कोरोची- उत्कृष्ट वैद्य; करुणाकर बिल्ला,इचलकरंजी- कला गौरव; शरद माने,बारवाड- उत्कृष्ट गितकार; अरविंद कोठावळे,मजले- कला रत्न; सुनील कुंभार,इचलकरंजी- उत्कृठ मूर्तिकार; राजू पाटील, इचलकरंजी- कला भुषण; रत्नकांत चौगुले,कोल्हापूर- कला रत्न; दिपक पेटकर,तिळवणी- कलारत्न; हनमंत भागवत,इचलकरंजी- कला गौरव; नारायण गनबावले,कबनूर- आदर्श सिक्युरिटी गार्ड; राजेंद्र कांबळे,टाकवडे- सामाजिक कार्य; बाबुराव फरांडे,कबनूर- कला गौरव; प्रकाश वेदांते,इचलकरंजी- कला विभुषण; हरीश शेरिगार,इचलकरंजी- उद्योजक; सौ. सीमा मुळे,कबनूर- कलारत्न यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
हा सन्मान पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार ता. ३० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५ वाजता शिवाजी चौक, संकल्प गार्डन, तारदाळ याठिकाणी महाराष्ट्र शासन आदर्श सरपंच पुरस्कार विजेते माननीय "आदर्श सरपंच- श्री भास्करराव पेरे (पाटील) पाटोदा, औरंगाबाद यांचे हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शानदार सोहळ्यामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. अशी माहिती बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
Tags
इचलकरंजी