सभासदांच्या गरजा ओळखून त्यांना सेवा देणारी दत्तराज पतसंस्था .....

  रमेशकुमार मिठारे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटना)


प्रेस मीडिया लाईव्ह :

नृसिंहवाडी : 

    येथील   दत्तराज पतसंस्था ही सभासदांच्या गरजा ओळखून त्यांना सेवा देणारी पतसंस्था आहे.कोरोना काळात  संस्थेने क्युआर कोड काढून  सेवा दिल्याने सभासदांना अर्थीक व्यवहार करणे सोयीचे झाले. शासनाच्या सर्व सहकार नियमांचे अवलंब करून वेळेत कर्ज वसुली करत असल्याने एन.पी.ए व थकबाकी प्रमाण कमी आहे. यामुळे सभासदांनी पतसंस्थेकडे व्यवहार करावे असे मत २५ व्या वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावरून महाराष्ट्र राज्य पतसंस्था कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष रमेशकुमार मिठारे यांनी व्यक्त केले.ते पुढे म्हणाले की राज्यातून सर्वपतसंस्था कडून नियामक मंडळच रद्द करून पतसंस्था ठेवीना संरक्षण देण्याकरिता डिपाॅझीट गॅरंटी इन्शुरन्स कारपोरेशन तयार करण्यात यावी व अशाप्रकारचे सर्व पतसंस्थानी ठराव करावेत असे मत व्यक्त केले. यावेळी चेअरमन अशोकराव पुजारी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत मिठारे यांचा सत्कार करण्यात आला. विषय पत्रिकेचे वाचन शशिकांत कोडणीकर व वैभव पुजारी यांनी केले.दत्तराज पतसंस्थेचे अध्यक्ष  पुजारी म्हणाले सध्या संस्थेचा रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू आहे सभासदांना केंद्रबिंदू मानून चांगल्या विधायक कार्यामुळे संचालक व सभासदांच्या बळावर संस्थेचा दिवाळीमध्ये दोन नवीन शाखांचा विस्तार करण्याचे योजिले आहे असे आपल्या प्रास्ताविकात व्यक्त केले.

स्वागत संस्थेचे उपाध्यक्ष राजु पुजारी यांनी केले. दर्शन वडेर व विभुते सर यांनी सूत्रसंचालन केले. संचालिका स्मिता मुडशिंगे यांनी आभार मानले. 

यावेळी संचालक अवधुत पुजारी, राजु जोशी, उदय कुलकर्णी, दिवाकर रुक्के, बाळासो बरगाले, संजय कोळी,श्रीकांत गवळी संचालिका रेवती पुजारी सर्व सेवक, पिग्मी एजन्ट उपस्थित होते.त्या नंतर सौ नीलम माणगांवे ज्येष्ठ साहित्यिक जयसिंगपूर यांचे व्याख्यान झाले.कार्यक्रमाला सरपंच- पार्वती कुंभार ग्रामपंचायत सदस्य सौ अनघा पुजारी, सौ चित्रा सुतार विजया पुजारी ,मीरा पुजारी , ललिता बरगाले, नृसिंहवाडीतील सर्व बचत गटातील महिला, सर्व आशा सेविका व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टाकळीवाडी नामदेव निर्मळे

Post a Comment

Previous Post Next Post