एका पोलीस कर्मचाऱ्याची कार खरेदीवरून आरटीओ विभागातील दोघांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 कोल्हापूर काही दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलीस दलाने आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत एका आंतरराष्ट्रीय टोळीला जेरबंद केले होते. यामध्ये तब्बल सव्वा पाच कोटी रुपयांच्या आलिशान महागड्या 31 कार जप्त केल्या होत्या. या कारवाईनंतर कोल्हापूर पोलीस दलाचे संपूर्ण देशभरात कौतुक झाले. या टोळीला अटक तर केली मात्र आता एक नवीनच प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याची कार खरेदीवरून आरटीओ विभागातील दोघांनी  फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित पोलिसाने पोलीस अधीक्षकांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

आज.. कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलीस फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संबंधित पोलिसाने पोलीस अधीक्षकांसह प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे  तक्रार केली असून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 पोलिसांनी केली प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे तक्रार दरम्यान, पोलीस कर्मचारी बाबासो गुलाब मुल्ला यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना एक तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये मुल्ला यांनी प्रदेशिक परिवहन कार्यालयातील दोन वरिष्ठ लिपिकांवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. त्यांनी आपल्या अर्जात म्हटले आहे की, कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील एक वरिष्ठ लिपिक माझ्या ओळखीचे होते. त्यांनी आणि त्यांच्याच एका साथीदार लिपिकाने फायनान्स कंपनीने ओढून आणलेली कार विक्री करण्याबाबत सांगितले. आलिशान कार केवळ 10 लाखांना मिळत असल्याने आपण त्यांना लगेचच सुरुवातीला 6 लाख रुपये दिले आणि गाडी घेतली. गाडी नावावर झाल्यानंतर 4 लाख रुपये द्यायचे ठरले होते. संबंधित कर्मचाऱ्यांनी कार पासिंग करून देतो सांगून माझ्याकडून कार घेऊन गेले. दोन दिवसानंतर त्यांच्याकडे कार बाबत विचारणा केली मात्र त्यांनी दिलेली कार चोरीची होती ती पोलिसांनी जप्त केली आहे असे संगितले. त्यानंतर ते माझे पैसे द्यायला टाळाटाळ करत असल्याचे या तक्रारीत मुल्ला यांनी म्हटले आहे. प्रादेशिक परिवहन विभागातील हे दोन्ही लिपिक संबंधित टोळीच्या संपर्कात असून त्यांच्याकडून कार घेऊन त्यांच्या चेसी नंबरमध्ये फेरफार करून त्याची विक्री करत असल्याचेही मुल्ला यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता त्यांच्या या तक्रारी नंतर काय कारवाई होणार हे लागणार आहे.

दरम्यान, बाबासो गुलाब मुल्ला यांनी ज्या दोन कर्मचाऱ्यांबाबत तक्रार दिली आहे त्याचे पुरावे तपासून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. शिवाय यांच्याकडे अशा पद्धतीच्या कार विक्रीसाठी येत होत्या ही गंभीर बाब असून, याची सखोल चौकशी व्हावी आणि आपले त्यांच्याकडे अडकलेले 6 लाख रुपये सुद्धा परत मिळावेत, अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post