चिखली कुदळवाडीतील नागरी समस्यांचा तातडीने निपटारा केला

मनपा आरोग्य विभागाचे दीपक गुप्ता यांनी केले अभिनंदन 


प्रेस मीडिया लाईव्ह :

  चिखली कुदळवाडी परिसरातील सेवा रस्त्याच्या कडेला गेले काही आठवडे कचऱ्याचे ढीग पडले होते.मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे,दुर्गंधीयुक्त कचरा यामुळे मच्छरांचे साम्राज्य पसरले होते.

याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस दीपक गुप्ता यांनी मनपा आरोग्य विभागास  विशेष लक्ष देऊन कुदळवाडीत औषध फवारणी आणि औष्णिक धुकीकरण करुन मोठे स्वछता अभियान राबवावे,अशी मागणी केली होती.

 प्रशासनाने येथील समस्येची दखल घेऊन परिसरातील संपूर्ण कचरा  उचलला आहे,याठिकाणी औषध फवारणी केली त्याबद्दल दीपक गुप्ता यांनी स्वछता कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post