रायगड पोलिसांची मटका अड्ड्यावर धाड, गुन्हा दाखल

 

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील सांगवी येथील सनझारा या फार्म हाऊसवर रायगड पोलिसांनी धाड टाकून येथे चालणारा बेकायदेशीर जुगार आणि मटका पोलिसांनी उध्दवस्त केला खरा मात्र त्या घराच्या मालकावर आणि अन्य महत्वाच्या लोकांवर पोलिसांनी कारवाई केली नाही अशी चर्चा असून केवळ कामगारांवर कारवाई केली अशी माहिती समोर येत आहे.


 ज्या कामगारांवर गुन्हे दाखल झाले त्यांच्या एकच रंगाच्या पेहरावावरून हे या फार्म वर काम करणारे मजूर असल्याचे प्रसिद्धीला दिलेल्या छायाचित्रावरुन स्पष्ट होत आहे.

कर्जत पोलिस आणि दादर सागरी पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. दरम्यान या गुन्ह्याचे. गोविंद पाटील तपास अधिकारी दादर सागरी पोलिस निरीक्षक हे असल्याने त्यांनी याबाबत प्रस्तुत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,. उत्तर देणे बंधनकारक नसून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली आहेत

जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याशी संपर्क केला.असता माहिती घेऊन सांगतो असे आमच्याशी बोलले त्यामुळेच मात्र फार्म हाऊस मालक अब्बास शेख त्यांच्यावर पोलिस मेहरबान का झाले अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post