आम आदमी पार्टी पुणे शहराच्या बाराव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वानवडी येथे संपन्न.



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : गुरूवारी दिनांक ८ जून २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आम आदमी पार्टी (आप) चे राज्य संघटक व पुणे कार्याध्यक्ष श्री विजय कुंभार यांच्या शुभहस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन वानवडी येथील माने नगर येथे संपन्न झाले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन आप चे संभाव्य उमेदवार ऍड. मनोज माने आणि आपचे दिनेश जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे वानवडी-कौसरबाग (प्रभाग ४३) चे समन्वयक विद्यानंद नायक यांनी केले. 

उद्घाटनपर मनोगतात कुंभार म्हणाले कि, पुणे शहराच्या अठ्ठावन्न प्रभागांमध्ये सर्वच्या सर्व १७३ जागा आम आदमी पार्टी जिंकण्यासाठी लढवणार असून त्याचा भाग म्हणून आजचे हे बारावे कार्यालयाचे उद्घाटन होते आहे. लोक निव्वळ पाठिंबा देत नसून आता स्वतःची साधनसंपत्ती सुध्दा पक्षासाठी देत आहेत, हि बाब पक्षाची लोकप्रियता सिध्द करत आहे. 

कराच्या पैशाचे सुयोग्य व्यवस्थापन करून पुणेकर नागरीकांना जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध करून देणे हे आम आदमी पक्षाचे धोरण आहे. आपल्या मुलाला उच्च विद्याविभूषित करणाऱ्या मनोज माने यांच्या आईचा आप पक्षात पक्षप्रवेश कुंभार जींच्या हस्ते या सोहळ्यात करण्यात आलेला हि उल्लेखनिय बाब घडली

ह्या जनसंपर्क कार्यालयाच्या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे शहरातील आप आदमी पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमास सुदर्शन जगदाळे, अभिजीत परदेशी, घनशाम मारणे, असगर बेग, उमेश बागडे, आनंद अंकुश, माधुरीताई गायकवाड, किरण कांबळे, अभिजीत गायकवाड, फेबियन आण्णा सॅमसन, दत्ता जाधव, अनिल कोंढाळकर, पियुष हिंगणे, राहुल अग्रवाल, मैथिली मनकवाड, रविराज डोंगरे, रेणुका सुर्यवंशी, केदार ढमाले, रोहित आंधळे, आर्चबिशप सिन्हा, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, राजेंद्र नेने, अजय पैटणकर व इतर आप कार्यकर्ते आणि वानवडीतील स्थानिक नागरिक उपस्थितीत होते.



Post a Comment

Previous Post Next Post