क्राईम : पुणे येथे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे खून करण्यात आला

 या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे येथे  एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय तरुणाची निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. हि हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. 

अमरावती मध्यवर्ती कारागृहात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत असलेलेले उद्रेश्वर गायकवाड यांच्या मुलाची पुण्यात काल रात्री निर्घृणपणे खून करण्यात आला . त्यांचा मुलगा अवघा 21 वर्षांचा होता. गिरीधर उद्रेश्वर गायकवाड असे मृत मुलाचे नाव आहे. तरुण मुलाच्या मृत्यूमुळे गायकवाड कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. गिरीधरची हत्या करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता गायकवाड कुटुंबाकडून केली जात आहे. एका तरुणीने ही हत्या घडवून आणल्याचे प्राथमिक तपासात समजत आहे. गिरीधरचे त्या तरुणीसोबत काय संबंध होते? दोघांचे भांडण झाले होते का? झालं असेल तर त्यांच्यात इतक्या टोकाचं भांडण का झालं असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.


मृत गिरीधर हा मंगळवारी रात्री आपल्या पुण्यातील घरी होता. त्याला रात्री नऊ वाजताच्या सुमारास एका तरुणीचा फोन आला. त्या फोननंतर तो घराबाहेर पडला. घराबाहेर पडल्यानंतर त्या तरुणीने इतर पाच सहकाऱ्यांसोबत त्याची निर्घृणपणे खून कर  केली. आपला मुलगा घराबाहेर पडून बराच वेळ झाला तरी घरी आला नाही म्हणून गायकवाड कुटुंबाने त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. यानंतर त्याचा मृतदेह सापडला त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यावेळी चार पुरुष आणि एक तरुणी यांनी गिरीधर याच्यावर कोयत्याने सपासप वार करून सासवडच्या दिशेने पळ काढल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post