चंद्रपूर मनपातील विद्यमान नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल व माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेविका राजलक्ष्मी कारंगल व माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला. यासोबतच महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण व मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव यांच्या पुढाकाराने मुंबई शहरातील श्री. गुरज्योत सिंग किर आणि त्यांचे सहकारी श्री. गंगादीप सिंग चुढा, श्री. अश्मीत सिंग बांगा, श्री. समीर शेख, श्री. रश्पाल सिंग बुमराह, श्री. अर्जुन शिर्के आणि श्री. रितेश गुर्राला यांच्यासह इतर सहकाऱ्यांचा आणि पक्षाचे नेते आनंद शिंदे यांच्या पुढाकाराने मिलिंद जगताप, पंकज चंदनशिवे, मनोज वेलॉद्रा, कैलास गायकवाड यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

या पक्ष प्रवेश कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख,  मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, चंद्रपूर जिल्हा निरिक्षक प्रविण कुंटे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी सर्व मान्यवरांना मिळेल. आजच्या पक्ष प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर पक्षाचा प्रभाव वाढण्यास नक्कीच सहकार्य मिळेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाच्या जागा वाढण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्नांची शिकस्त करू, असे प्रतिपादन अजितदादांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post