आनंदराव वि पाटील यांनी मराठी माती ही कविता तमिळनाडूच्या राज्यभवना मध्ये वाचून महाराष्ट्र व मराठी भाषेची आण बाण शान उंचावली...

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे शहर प्रतिनिधी : जीलानी उर्फ मुन्ना शेख

पुणे दि २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त तामिळनाडूच्या राज्यपालांचे प्रधान सचिव, श्री.आनंदराव वि. पाटील यांच्या काव्य वाचनाने  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित वि वा शिरवाडकर यांच्या साहित्यकृती वाचन उपक्रमाचा आज समारोप झाला. त्यानिमित्ताने तामिळनाडूच्या राज्य भावनांमध्ये ’मराठी माती’  ही कविता त्यांनी सादर केली आहे.

    * मराठी माती कविता *

माझ्या मराठी मातीचा , लावा ललाटास टिळा ; हिच्या संगाने जागल्या , दऱ्याखोऱ्यांतील शिळा,,

 हिच्या कुशीत जन्मले , काळे कणखर हात ; ज्यांच्या दुर्दम धीराने , केली मृत्यूवरी मात ,, नाही पसरला कर ,कधी मागायास दान ; स्वर्णसिंहासनापुढे , कधी लवली ना मान ,,

हिच्या गगनांत घुमे , आद्य स्वातंत्र्याची द्वाही ; हिच्या पुत्रांच्या बाहूत , आहे समतेची ग्वाही ,,

 माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन स्वर्गलोकाहून थोर मला हिचे महिमान ,, 

रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी चारी वर्णांतुनी फिरे सरस्वतीची पालखी,,

रसरंगात भिजला येथे शृंगाराचा स्वर येथे अहंता द्रवली झाले वसुधेचे घर ,, 

माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान ,,

माझ्या मराठी मातीचा , लावा ललाटास टिळा ; हिच्या संगे जागतील , मायदेशांतील शिळा,, 

https://youtu.be/GJO4qafM_Z4

कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांची ही सुंदर आणि देखणी मनात मराठीचा अभिमान निर्माण करणारी अशी ही कविता श्री.आनंदराव वि. पाटील यांनी तामिळनाडूच्या राज्य भावनांमध्ये गाजवली त्यामुळे आज महाराष्ट्राची मान उंचावली आहे. खरोखरच आज  मा.आनंदराव .वि. पाटील यांनी हे सिद्ध केले आहे की मराठी माणूस जगामध्ये कुठेही असू द्या त्याला आपल्या मातृभाषा अर्थातच मराठी भाषेचा गौरव आणि अभिमान सदैव राहणार.

मराठी भाषा दिवस (जागतिक मराठी भाषा दिवस, मराठी भाषा दिन ) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला साजरा केला जातो.. मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा,हि समस्त मराठीजनाची मागणी आहे। इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता,करता ब्रम्हविध्या म्हंटले आहे,शब्दब्रह्मही म्हंटले आहे।याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते।अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे. त्यांचा हा जन्म दिन मराठी भाषा दिन साजरा केला जातो.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

 पुणे शहर प्रतिनिधी : जीलानी उर्फ मुन्ना शेख

Post a Comment

Previous Post Next Post