हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरजेच्या हजरत पीर मिरासाहेब ( रहे ) यांच्या ऊरूसास प्रारंभ



प्रेस मीडिया लाईव्ह :

 मिरज : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरजेच्या हजरत पीर मिरासाहेब ( रहे ) यांच्या ऊरूसास प्रारंभ झाला असून सातपुते वाड्यातून चर्मकार समाजाचा मानाचा गिलाफ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हजरत पीर मिरासाहेब ( रहे ) यांना अर्पण करण्यात आला. पहाटे पासूनच दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होती.  राज्यभरातून भाविक मिरजेच्या हजरत पीर  मिरासाहेब (रहे.) ऊरूसास येत असतात. 647 वा चर्मकार समाजाचा मानाचा पहिला गिलाफ भक्तिमय वातावरणात अर्पण करण्यात आला.

हजरत पीर  ख्वाजा शमनामिरा (रहे) मिरज दर्गाचा मानाच्या गलेफ साठी दर वर्षी चार राज्यातून भाविक येतात, हजारो भक्त दरसाल येतात गेले दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने गर्दी मर्यादित होती, पण यावेळी शिथिल असल्याने गलेफ भक्तिमय वातावरणात अर्पण करण्यात आला. नेहमी प्रमाणे मिरजेतील मधली गल्ली,सातपुते वाडा येथून गलेफला प्रारंभ झाला, मंडई मार्ग दर्गा कमान येते नगराखाना कमानीतून पार होत, दर्ग्यात प्रवेश होऊन सूर्योदय पूर्वी गलेफ अर्पण झाला.

यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी नियोजन बाबू सातपुते, हिरालाल सातपुते, श्रीकांत सातपुते, प्रशांत सातपुते, विशाल सातपुते, दत्ता सातपुते, विजय सातपुते, शरद सातपुते, दीपक सातपुते, किरण सातपुते, तानाजी सातपुते आदिनी केले तर यावेळी माजी महापौर इद्रिस नायकवडी, माजी सभापती आंनदा देवमाने,बबन दबडे, गंगाधर कुरणे अनेक मान्यवर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post