क्राईम न्यूज : लेफ्टनंट कर्नल महिलेने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली , लष्करातील आज ब्रिगेडियर असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

  


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मिलीटरी इंटलिजन्स ट्रेनिंग स्कूलमधील गुप्तवार्ता संकलन प्रशिक्षण संस्था, एका लेफ्टनंट कर्नल महिलेने दोन दिवसांपूर्वी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी लष्करातील आज ब्रिगेडियर असलेल्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.

ब्रिगेडियर अजित मिलू असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यात ४३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला होता. ४३ वर्षीय महिला अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, संबंधित लेफ्टनंट कर्नल महिलेची जयपूर येथे पोस्टिंग होती. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी त्या पुण्यात आल्या होत्या. मागील तीन महिन्यांपासून त्या मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेत होत्या. बुधवारी राहत्या घरात त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आलं होतं. वानवडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान वानवडी पोलिस प्रकरणाचा तपास करत असताना त्यांना अजित पिल्लू यांच्या त्रासाला कंटाळून संबंधित महिलेने आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं होतं. अजित मिलू यांची देखील भारतीय सैन्यदलात वरिष्ठ पदावर पोस्टिंग आहे.

त्यांनी महिला अधिकारी एकट्या असल्याचा गैरफायदा घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले. त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवले. तसेच त्याचे व्हिडीओ आणि फोटो काढून ते व्हायरल करून त्यांची बदनामी करण्याची धमकी देत असल्याने त्यांनी आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post