निवडणुकीतील आघाडी बाबत त्या-त्या जिल्ह्यातील नेते, कार्यकारिणीने ठरवावे:.... शरद पवार.


प्रेस मीडिया वृत्तसेवा : अनवरअली शेख :

राज्यात सत्तेत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र लढणार की स्वतंत्र याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झाले नाही. शहर दौ-यावर असलेले शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, ”महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीतील आघाडीबाबत त्या-त्या जिल्ह्यातील नेते, कार्यकारिणीने ठरवावे. राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. पक्षाच्या पदाधिका-यांनी आघाडीच्या घेतलेल्या निर्णयाबाबत मला विचारल्यावर मी योग्य की नाही हे सांगेन”.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहे. त्यासाठीची आचारसंहिता डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लागू शकते. त्यामुळे निवडणुकीला केवळ अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी राहिला आहे. महापालिकेची निवडणूक तीन सदस्यीय पद्धतीने होणार आहे. प्रभाग रचनेच्या कच्चा प्रारुप आराखड्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post