३५९ भोसरी ते मंचर हा नवीन बस मार्ग आजपासून सुरू



प्रेस मीडिया वृत्तसेवा :  अनवरअली शेख :

पुणे महानगर परिवहन महामंडळ पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक ३५९ भोसरी ते मंचर हा नवीन बस मार्ग आजपासून सुरू करण्यात आला. भोसरी बीआरटी टर्मिनल येथे आमदार महेश लांडगे आणि पीएमपीएमएलचे संचालक तथा स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्या हस्ते या बस सेवेचे उद्घाटन करण्यात आले.

भोसरी ते मंचर हे अंतर ४९ किलो मीटर असून प्रवास भाडे पन्नास रुपये आहे. या मार्गावर ५ बसेसचे नियोजन करण्यात आले असून दर तासाला ही बस सेवा उपलब्ध आहे. दिवसभरात एकूण दहा फेऱ्या होणार आहेत.

मार्ग क्रमांक ३५९ भोसरी ते मंचर या बससेवेचा मार्ग राजगुरुनगर, राहुल पेट्रोल पंप, तुकाई वाडी, पानमळा, घाट वस्ती, जैदवाडी, पेठ फाटा, साठे नगर, तांबडेमळा, भोरवाडी, बडे मळा, खान वस्ती, एसटी स्टॅन्ड मंचर, आंबेगाव फाटा, भीमाशंकर फाटा असा आहे,या बससेवेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.


*जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 9975071717*

Post a Comment

Previous Post Next Post