दानोळीत तरुणांवर मगरीचा हल्ला, सुदैवाने तरुण बचावला.



हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले

         दानोळीत वारणा नदी काठावर दररोज 100 ते 150 तरुण व जेष्ठ नागरिक आंघोळीला जातात. सकाळी 8.30 ते 9.00 च्या दरम्यान कय्युम हमजा नदाफ (पिंजारी) हा तरुण काही मित्रांसोबत आंघोळीला गेला होता. 

       सर्व मुले आंघोळ करत असताना कय्युम देखील आत पोहत असताना अचानक मगरीने कय्युमच्या पायावर हल्ला केला त्या दरम्यान धाडसाने कय्युमने हालचाल जोरात केली व दैव बलवत्तर म्हणून कय्युमचा पाय मगरीच्या तोंडातून निसटला परंतू चार पाच दात पायाच्या वेगवेगळ्या ठिकाणी घुसले आहेत तोपर्यंत नदीपात्रातील सर्व मुलांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता कय्युम नशीबाने मगरीच्या तावडीतून बाहेर आला. 

       मगरीची बातमी वार्‍यासारखी गावात पसरली व वारणा नदीवर लोकांचा महापूर लोटला व कय्युमला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तत्पूर्वी वनविभागाला याची कल्पना देण्यात आली तसेच प्रशासनाने गावातील नागरिकांना व महिलांना सतर्क रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे या प्रकरणामुळे दानोळीत व परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे व वन विभागाने मगरींचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post