इचलकंरजी येथील प्रभाग क्र. 16 मधील नागरिकाच्या व शिवसेना उपशहर प्रमुख बसय्या स्वामी याच्या वतीने रस्ता न उकरण्याबाबत इचलकंरजी नगरपालीकेच्या नगराध्यक्षा साै अलका स्वामी याना निवेदन .





तारदाळ प्रतिनिधि श्रीकांत कांबळे :

इचलकंरजी येथे काल झालेल्या सर्वसाधारण सभेत सांगली राेड येथील फॉच्युन प्लाझा, पाटील मळा येथील पूर्व बाजुचे गटारीचे पाणी पश्चिम बाजूच्या सारण गटारीत साेडण्यासाठी नव्याने केलेला रस्ता उकरुन पाईपलाईन टाकणेचा निर्णय घेणेत अाला आहे परंतु वीस वर्षानंतर विविध आंदोलन करुन सांगली राेडचा काेट्यावधी रुपयाचा खर्च करुन रस्ता बनवण्यात आलेला आहे. तसेच पूर्व बाजुला असलेल्या गटारीचे पाणी जर पश्चिम बाजूच्या सारण गटारीत साेडले तर पश्चिम बाजूच्या गटारीवर लाेड येऊन पाटील मळ्यातील घरामध्ये पाणी घुसण्याचा धाेका आहे या आगाेदर सुध्दा पाणी घुसलेले आहे. रस्त्याच्या पूर्व बाजुला गटार मंजूर असुन गेल्या अनेक वर्षात ही सारन गटार बनवण्यात आलेली नाही या सारन गटारीचे काम न करण्यासाठी काही माेठे लाेकांचे हितसंबध गुंतलेले असुन सांगली राेड, येलाज मळा परीसरामध्ये आज अखेर काेणतीही गटार बनवण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकाचा रस्ता उकरण्यासाठी तीव्र विरोध आहे तेव्हा पूर्व बाजुची गटार हाेणे आवश्यक असुन ते झाल्यास रस्ता खाेदणेचे काेणतेही कारण दिसत नाही सदर रस्ता खाेदण्यात आल्यास शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन छेडण्यात येईल याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी बसय्या स्वामी, महादेव गाैड,दत्ता मांजरे तारदाळकर, विजय पाटील,निलेश पिसे, सुरज येलाज, राजु येलाज उपस्थिति हाेते.

Post a Comment

Previous Post Next Post