आटपाडी तालुका शिक्षक समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर !



ओमकार पाखरे : 

  आटपाडी तालुका (जिल्हा: सांगली ): आटपाडी तालुका नूतन कार्यकारिणीत जुन्या व नव्या कार्यकर्त्यांना तालुक्यातील सर्व भागांना समान न्याय देत समतोल साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन शिक्षक बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान संचालक यु.टी. जाधव यांनी केले. शिवाय शिक्षक समितीच्या या कार्यकारिणीत 100% नव्या चेहऱ्यांना संधी देऊन समितीची वाटचाल व घौडदौड अधिक गतिमान होण्यास मदत होईल असे सांगितले. .                                                       

       शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड अध्यक्षस्थानी होते .जिल्हा कार्याध्यक्ष सतीश पाटील यांनी नव्या निवडी जाहीर केल्या. शिक्षक बँकेचे चेअरमन सुनीलराव गुरव, सोलापूर जिल्हा सरचिटणीस अमोगसिद्ध कोळी,जिल्हा संपर्कप्रमुख राजाराम शिंदे ,भाजपा नेते जयवंतभाऊ सरगर, उपसभापती दादासाहेब मरगळे,आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष राजेंद्र खरात आदींनी नूतन कार्यकारणीस शुभेच्छा दिल्या.                          

        यावेळी तालुकाध्यक्ष  म्हणून दिघंचीचे सुपुत्र संजय कबीर,सरचिटणीस म्हणून निंबवडेचे नानासाहेब झुरे, कार्याध्यक्षपदी झरेचे विजयराव पवार,कोषाध्यक्षपदी करगणीचे इन्ताब इनामदार यांची निवड करण्यात आली. तालुका उपाध्यक्षपदी झरेचे सचिन सासणे, खरसुंडीचे सिराज तांबोळी, दिघंचीचे संतोष पिसे, आटपाडीचे बाळासाहेब साळुंखे यांची वर्णी लागली.

      तालुका नेतेपदी तळेवाडीचे वरीष्ठ मुख्याध्यापक अधिकराव खांडेकर,सल्लागारपदी रमेश हेगडे व रमेश विभुते, संपर्क प्रमुख पदी खरसुंडीचे किशोर पिसे, प्रसिद्धी प्रमुखपदी भास्करराव डिगोळे, तंत्रस्नेही म्हणुन सत्यवान माने,सहचिटणीसपदी दिनेश माने आदींची निवड करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या.  मावळते अध्यक्ष शामराव ऐवळे यांनी स्वागत केले. सरचिटणीस प्रवीण बाड यांनी प्रास्ताविक केले.

      यावेळी दीपक कुंभार, सचिन देठे ,शिवाजी खताळ ,श्रीकांत कुंभार ,सुभाष सुतार ,रवींद्र सावंत, जिल्हा आदर्श शिक्षक हैबतराव पावणे, अजय राक्षे ,हरिदास जावीर, चंद्रकांत गवळी, सुनिल पवार, सतीश मदने, सचिन त्रिगुणे, सत्यजित भांबुरे ,सतीश पुसावळे, भीमराव शिंदे ,यशवंतराव मोरे, विठ्ठलपंत माळी, सर्जेराव पुजारी आदी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post