नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज नागरिकांनी घाबरुन न जाता जागरुक राहून सतर्कता बाळगत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, नगराध्यक्षा ॲड सौ अलका स्वामी .





इचलकरंजी - प्रतिनिधी : 

कोकणासह धरण पाणलोट क्षेत्रात सुरु असलेला पाऊस, धरणातून काही प्रमाणात सुरु असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत कमालीची वाढ होत चालली आहे. त्यामुळे महापूराची परिस्थिती निर्माण होऊ लागल्याने नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा अ‍ॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिली. दरम्यान, नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी दुपारी पूरग्रस्त भागातील शेळके मळा परिसरात भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. तसेच नागरिकांनी घाबरुन न जाता जागरुक राहून सतर्कता बाळगत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन केले.*

*गत काही दिवसांपासून शहर परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्याचबरोबर धरण पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पाऊस आणि धरणातून पाणी सोडण्यात आल्याने पंचगंगा नदीचे पाणी इशारा* *पातळीपर्यंत पोहचले आहेत. आणखीन काही दिवस पाऊस असाच बरसत राहिल्यास महापूराची शक्यता नाकारता येत नाही. परंतु तशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी* *नगरपरिषदेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. गरज पडल्यास नागरिकांचे कोठे स्थलांतर करायचे, जनावरांची कोठे छावणी उभारायची याची पूर्वतयारी करण्यात आली असून त्यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. पाणी पातळीत वाढ होत असल्याने पूर क्षेत्रातील नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून वेळोवेळी दिल्या जाणार्‍या सूचनांचे पालन करुन नागरिकांनी सहकार्य करावे.*

*नगरपरिषदेच्या आपत्कालीन यंत्रणेत एक यांत्रिक बोट, एक फायबर बोट, 25 लाईफ जॅकेटस, 6 लाईफ रिंग्ज, 500 फुट दोर, 3 मेगा फोन, 3 गळ, 2 ट्युब/इनर सेट, 2 इर्मजन्सी लॅम्प, 2 स्लायडिंग शिडी, 8 रिफ्लेक्टर जॅकेटस् उपलब्ध आहेत. कोरोनाच्या* *पार्श्‍वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याच्या अनुषंगाने एकूण 122 ठिकाणी छावण्यांचे निश्‍चितीकरण करण्यात आले असून सर्वच ठिकाणी मास्क, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण साधने, आरोग्य सेवा, उपलब्धता ठेवण्यात येणार आहेत.*

*जर महापूराची परिस्थिती निर्माण झालीच तर पूरक्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर कोठे करायचे याची तयारीही करण्यात आली आहे. लक्ष्मी दड्ड परिसरातील नागरिकांचे आदी व्यंकटराव विद्या मंदिर झेंडाचौक, पद्मावती कन्या शाळा, नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा तांबेमाळ येथे, नदीवेस परिसरातील नागरिकांचे विठ्ठल मंदिर गेस्ट हाऊस, छ. शिवाजी विद्यामंदिर खंजिरे मळा, नरसोबा कट्टा देवालय येथे, टाकवडे वेस परिसरातील नागरिकांचे छ. शिवाजी विद्या मंदिर खंजिरे मळा, बसवेश्‍वर विद्या मंदिर, अनुबाई कन्या शाळा येथे, पि. बा. पाटील मळा परिसरातील नागरिकांचे जयभवानी विद्या मंदिर क्र. 11, कॉ. के. एल. मलाबादे शाळा क्र. 39, नगरपरिषद उर्दु शाळा इमारत येथे तर चंदूर रोड पूरग्रस्त नागरिकांचे नेताजी सुभाषचंद्र बोस शाळा, पद्मावती कन्या शाळा क्र. 17 व महात्मा जोतिबा फुले शाळा नं. 12 याठिकाणी स्थलांतर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर जनावरांसाठी वडगांव बाजार समिती, वेदभवन आणि श्रीमंत* *घोरपडे नाट्यगृह येथे चारा छावणी उभारण्यात येत असल्याचेही नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी सांगितले.*

*यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार बांधकाम सभापती उदयसिंह पाटील,आरोग्य* *सभापती संजय केंगार, नगरसेवक राहुल खजिंरे, माजी उपनगराध्यक्ष रविसाहेब रजपुते  उपमुख्यधिकारी केतन गुजर, कामगार अधिकारी विजय राजापुरे,अपत्ती व्यवस्थापन संजय कांबळे व इनपा अधिकारी व  रेस्कु फौर्स*

Post a Comment

Previous Post Next Post