टाकळीवाडी येथील जवानाचा अपघाती मृत्यू



पृथ्वीराजसिंग राजपूत : 

दत्तवाड : टाकळीवाडी ( ता . शिरोळ )येथील जवान प्रशांत चंद्रकांत निर्मळे ( वय ३५ ) हे भोपाळ मध्य प्रदेश येथील रेल्वे अपघातात शहीद झाले आहेत . ते पंजाब येथील फिरोजपूर येथे कार्यरत होते . ते सुट्टीसाठी गावी येत होते . त्यावेळी भोपाळ येथील अपघातात ते शहीद झाले.त्यांचे प्राथमिक शिक्षण इचलकरंजी येथे झाले असून , २००१ मध्ये कोल्हापूर येथून ते सैन्यात भरती झाले होते . गुरुवार , दि . २ ९ रोजी टाकळीवाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून , ग्रामपंचायतीपासून त्यांची सकाळी अकरा वाजल्यापासून अंत्ययात्रा काढली जाणार आहे . त्यांच्या पश्चात वडील , पत्नी , दोन मुली , भाऊ असा परिवार आहे .

Post a Comment

Previous Post Next Post