इचलकरंजी : येथील डॉ.सौ स्वाती कडतारे यांना कोविड योध्दा हे सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.



मनु फरास : 

इचलकरंजी :  येथील  डॉ.सौ स्वाती कडतारे  यांचा  भोने माळ परीसरात दवाखाना आहे .कोविडच्या अतिसंसर्ग काळांत  कोणतीही भीती न बाळगता व आपल्या जीवाची पर्वा न करता  रुग्णांना तपासून  औषध उपचार केले आहेत. या काळात आपला दवाखान्यातून एकही रूग्णांना  औषधोपचार विना परत पाठवले नाही. रुग्णांना योग्य मार्गदर्शन व योग्य उपचार करून रुग्णांना एक प्रकारे हिम्मत देण्याचे काम केले आहे व अजून सुरू आहे. एक डॉक्टरची काय जबाबदारी असते याची माहिती त्यांनी दिली.   त्यांच्या या कार्याची  दखल  प्रेस मीडिया या वृत्तसमुहा तर्फे घेण्यात येऊन त्यांचा प्रेस मीडिया वृत्त समूहाचे  संपादक माननिय  मेहबूब सर्जेखान यांचे हस्ते  कोविड योध्दा हे सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळीं प्रेस मीडियाचे कार्यकारी संपादक लियाकत सर्जेखान ,वरीष्ठ पत्रकार श्री मनुभाई फरास व नागरीक उपस्थीत होते

Post a Comment

Previous Post Next Post