हातकणंगले तालुक्यातील नेज शिवपुरी येथे सेंटरिंग कामगाराचा डोक्यात दगड घालून खून





युनूस लाडखान: 

नेज शिवपुरी येथील सेंटरिंग  कामगाराचा मजलेच्या गावठी दारू अड्ड्यावर  डोक्यात दगड घालून खून करण्यात आला,  हातकणंगले पोलिसांनी अर्ध्या तासात  संशयितास ताब्यात घेतले. 

  या बाबत सविस्तर माहिती अशी की,  हातकणंगले तालुक्यातील मजले गावाच्या हद्दीत हातकणंगले कुंभोज रोडवर सागर सदाशिव सनदी यांची शेती आहे,त्यालगत खडी मिक्सर प्लँटजवळ हातकणंगले पोलीसांच्या आशिर्वादान गेली 10 ते 12 वर्षापासुन एक महिला बेकायदेशीर गावठी दारु अड्डा चालवत होती. पोलीसांचा आशिर्वाद असल्यान हा अड्डा बिनधास्त चालु असल्यान ग्राहक मोठ्या संख्येन येत असतात. नेहमीप्रमाणे शिवपुरी इथला राजु वसंत जाधव हा एका मिञा बरोबर या दारु आड्यावर गेला होता.दुपारी दोन च्या दरम्यान या दोघात कोणत्या तरी कारणान वाद सुरु झाला, वादाच पर्यवसन हाणामारीत झाल.मिञान दगडाने राजु जाधव याच्या डोक्यात  तोंडावर घाव करुन त्याला ठार केल. या घटनेची माहीती हातकणंगले पोलीसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. जयसिंगपुर विभागाचे डीवायएसपी रामेश्वर वैंजाने यांनी घटनास्थळी  भेट देवुन सुचना केल्या.संशयीत दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतल आहे. मयत हा गवंडी व्यावसाय करत होता. त्याच्या पश्च्यात पत्नी ,मुलगा,आई,वडील ,भाऊ असा परीवार आहे.

  या घटनेची माहीती समजताच जयसिंगपूर चे पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैजणे, हातकणंगले पोलीस ठाण्याचे परि.पोलीस उपअधिक्षक साहील झरकर, पीएसआय सीमा बडे, चालक पोलीस भुषण शेटे, महादेव खेडकर, संग्राम पाटील, अतुल निकम, प्रकाश लाड, कुलदीप मोहीते व आय बाईकचे पोलीस कर्मचारी दाखल झाले.  घटनास्थळाचा पंचनामा करून या घटनेतील संशयीत आरोपी दिपक कांबळे ( मर्फी ) याला ताब्यात घेऊन  मयत राजू जाधव यांचा मृतदेह उत्तरीय शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला, या घटनेची माहीती मिळताच परिसरातील लोकानी गर्दी केली होती .

Post a Comment

Previous Post Next Post