राज्यातील शिक्षकांचा रखडलेल्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागला

 




राज्यातील शिक्षकांचा रखडलेल्या वेतनाचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. काही जिह्यांतील शिक्षकांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे पगार निधीअभावी झाले नव्हते. अखेर मंगळवारी शिक्षकांच्या पगारासाठी निधी मंजूर झाला असून त्याविषयी शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

मुंबईतील उत्तर, पश्चिम दक्षिण, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व पालघर, नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, मराठवाडय़ातील बीड, नांदेड, संभाजीनगर, धाराशीव, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नगर, नंदुरबार व नाशिक तसेच पुणे विभागातील सर्वच जिह्यांमध्ये शिक्षकांना वेतन देण्यासाठी निधीच शिल्लक नसल्याचे समोर आले होते.मात्र सध्या तरी शिक्षकांच्या एप्रिल महिन्याच्या पगारासाठी वेतन उपलब्ध झाले आहे

Post a Comment

Previous Post Next Post