हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले
बोरगाव ता.चिक्कोडी येथील टेक्स्टाईल पार्क वसाहतीतील रमेश टेक्स्टाईल नामक पावरलूम कारखान्यास विजेच्या शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. रविवार 16 रोजी लागलेल्या या आगीत कारखान्याचे जवळपास 35 लाखाचे नुकसान झाले असल्याचे कारखान्याचे मालक अमित जाधव यांनी सांगितले.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की,बोरगाव हेस्कॉमच्या वीज पुरवठा लंपंडावामुळे रविवार संपूर्ण दिवस बंद असलेल्या कारखान्यात सायं 7 वाजण्याच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा होऊन अधिक दाबाच्या प्रवाहाने,कारखान्यात शॉर्ट सर्किट झाल्याने संपूर्ण कारखान्याला अचानक आग लागली शेजाऱ्यांनी सदर घटनेची कल्पना कारखाना मालकांना कल्पना दिली असता,तातडीने अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला.परिणामी आगीत कारखान्यातील मशीन,रॅपिड यंत्रमाग,सुताच्या गाठी,नवीन तयार होत असलेले कापड यासारख्या अन्य इतर वस्तू,इमारतीचा काही भाग आगीत भस्मसात होऊन जवळपास 35 लाखाचे नुकसान झाल्याची फिर्याद स्वतः कारखाना मालकांनी सदलगा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे.
ऐन कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेटीस धरले आहे.त्यात पहिल्यांदाच यंत्रमाग,कापड व्यवसाय मोठ्या मंदित असताना,कारखान्याला आग लागून लाखोंचे साहित्य जवळजवळ जळून पूर्णतः खाक झाले असल्याने पुन्हा कारखानदारीवर मोठे संकट निर्माण झाले आहे.लाखो रुपयांची व्याजरुपी रक्कम गोळा करून उभा केलेल्या कारखान्याची अचानक झालेली नासधूस पाहता,पुन्हा कर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर नपेलवणारा वाटू लागला आहे. त्यामुळे कारखाना मालक मोठ्या अडचणीत सापडला असून पुन्हा कारखाना उभारणीसाठी शासनाने मदत करणे गरजेचे असल्याची मागणी केली आहे.