माणुसकी फाऊंडेशन मूळे बेपत्ता वृद्ध घरी परतले




   

हातकणंगले तालुका प्रतिनिधी - आप्पासाहेब भोसले 

कुंभोज येथील हिंगणगाव या रोडवर 60 ते 65 वयाची एक वयोवृद्ध व्यक्ती फिरत असताना  कुंभोज चे पत्रकार सचिन भानुसे यांच्या निदर्शनास आली त्यावेळी त्यांनी तात्काळ माणुसकी फाउंडेशनचे प्रविण केर्ले यांना संपर्क करत याची माहिती दिली सदर माहिती समजतात प्रविण केर्ले यांनी त्यांचा फोटो घेऊन ही माहिती व्हाट्सअप द्वारे सोशल मीडियावर वायरल केली सदरच्या व्यक्तीने जवाहर नगर येथील पत्ता सांगितल्याने अनेकांचे फोन येत होते येतो त्याचवेळी अमित बुगड व राज कन्नूर वैभव मेध यांनी संपर्कातील काही व्यक्तींना घालून त्यांनी त्या घराचा पत्ता शोधत माणुसकी फाउंडेशन चे प्रविण केर्ले यांना सांगितला यावेळी माणुसकी फाऊंडेशनचे प्रविण केर्ले,आकाश नरुटे, सचिन भोसले,किरण पारखे यांनी त्या व्यक्तीस कुंभोज येथे जाऊन त्यांना त्यांच्या घरी पोहोच केले त्यावेळी त्यांचे चिरंजीव प्रकाश सौंदतीकर यांनी गेली चार दिवस म्हणजे शुक्रवार पासून बेपत्ता असल्याचे सांगत पोलीस स्टेशन तक्रार दिल्याचे सांगितले व त्यांना मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले

यावेळी माणुसकीचे प्रविण केर्ले,आकाश नरुटे,सचिन भोसले, किरण पारखे,कुभोज,विनायक पोतदार ,लखन भोसले,  मोसिन सुतार , पत्रकार सचिन भानुसे, रोहित कोळी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post