गोकुळ' घेण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून नियोजन करण्याची गरज ..पालकमंत्री पाटीलशिरोळ तालुका प्रतिनिधी : ओंकार पाखरे.

गोकुळ  पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पाठोपाठ पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी शिरोळ येथे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी गोकुळच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी सावकर मादनाईक आणि माजी आमदार उल्हास पाटील, अनिलराव यादव यांच्याशी चर्चा केली.

गोकुळ निवडणूक पार्श्वभूमीवर प्रमुख नेतेमंडळी, इच्छुक उमेदवार, स्थानिक गटनेते यांनी शिरोळ तालुक्याचा दौरा सुरू केला आहे. जिल्हा पातळीवर नेत्यांची धामधूम सुरू झाली आहे. गोकुळसाठी राजू शेट्टी यांनी दोन्ही गटांकडे एक एक जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. उल्हास पाटील यांनी पत्नीसाठी राजर्षी शाहू आघाडीकडे उमेदवारीची मागणी केली आहे. याशिवाय बी. जी. माने, अजित शहापुरे, दिलीपराव पाटील, भीमगोंडा बोरगावे यांच्यासह काही दूध संस्था अध्यक्षांनीही उमेदवारीसाठी गळ घातली आहे.

पालकमंत्री पाटील व मंत्री मुश्रीफ यांनी गोकुळ निवडणुकीची जय्यत तयारी करीत शिरोळमधील काही प्रमुखांच्या भेटी घेतल्या. सावकर मादनाईक व उल्हास पाटील, गणपतराव पाटील यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा करून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शेखर पाटील, सर्जेराव शिंदे, अनंत धनवडे, अशोक कोळेकर, योगेश पुजारी, दरगू गावडे, रणजीत पाटील उपस्थित होते.

'गोकुळ'ला मी आपल्यासोबतच

गोकुळ संघाच्या निवडणुकीत मी आपल्याबरोबर असल्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. रविवारी रात्री पालकमंत्री सतेज पाटील व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ते बोलत होते. 'गोकुळ'ची सत्ता काबीज करण्यासाठी शिरोळमध्ये चांगले नियोजन करावे यासह विविध विषयांवर पाऊण तास खलबते झाली.

रविवारी शिरोळ येथे दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी खा. राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी सावकर मादनाईक आणि माजी आमदार उल्हास पाटील, अनिलराव यादव यांच्या भेटीनंतर जयसिंगपूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेतली. शिवाय शिरोळ तालुक्यात होत असलेल्या घडामोडींची माहिती घेऊन 'गोकुळ' घेण्यासाठी सर्वांनी एकत्र राहून नियोजन करण्याची गरज आहे. त्यासाठी मंत्री यड्रावकर यांनी प्रयत्न करावेत, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, सर्जेराव शिंदे, तातोबा पाटील, नितीन बागे, यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.Post a comment

0 Comments