आदर्श समाजसेविका प्रा. प्रेमलाताई वसंतराव साळी यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले



सांगली : प्रा. प्रेमलाताई वसंतराव साळी यांनी गेल्या पंचवीस वर्षात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन सोलापूर  यांनी दखल घेऊन प्रा. प्रेमलाताई वसंतराव साळी यांना आदर्श समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

     प्रा. प्रेमलाताई यांनी 2017  साली अखिल भारतीय ओबीसी महसभा महिला प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कार्यरत झाले, या माध्यमातून समाजातील महिलांना, बेरोजगार युवक-युवतींना शासकीय योजनेतून रोजगार मिळवून दिला तसेच शंभरी पार केलेल्या निराधार वृद्ध दाम्पत्यांना, वृद्धांना, महिलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली ,  अनेक वृद्धाश्रमाना मदत केली, त्याचबरोबर सांस्कृतिक परंपरा जोपासत अनेक महिला मंडळी, युवक मंडळांच्या माध्यमातून अनेक लोक हिताची कामे केली.

    दैनिक सकाळच्या तनिष्का गट अध्यक्ष या नात्याने  महानगरपालिका प्रशासनाच्या अस्वच्छ पाणी, वाढीव घरपट्टी व वीज दर या विरोधात आंदोलने सुद्धा केली आहेत. गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालकत्व स्वीकारले, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळावा यासाठी आंदोलन केले. शेरीनाला व वृक्षतोडी विरोधात मोर्चा काढला असे विविध जनहिताचे आंदोलने सुद्धा केली आहेत. समाजातील विधवा, निराधार तसेच वृध्द नागरिकांचे , मुलांचे , बेरोजगार युवकांचे सक्षमीकरण महिला व बालकल्याण या नात्याने आजपर्यंत सामाजिक कार्य करीत आले आहेत. त्याचबरोबर बचत गटाच्या व संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरीब विधवा निराधार महिलांना पापड उद्योग, शासकीय दुध डेअरी, दूध पावडर  पॅकिंग गारमेंट च्या माध्यमातून शिवणकाम, गारमेंट मध्ये शिवण रोजगार व घरबसल्या व्यवसाय उपलब्ध करून दिला. आहे. तसेच संकटात सापडलेल्या  अन्याय झालेल्या महिलांना संरक्षण देऊन त्यांना लागणारे पोलीस मदत सुद्धा मिळवून दिली आहे. प्रा. प्रेमलाताई यांनी समाज कारणाच्या माध्यमातून आज पर्यन्त विविध संस्थांमध्ये सुद्धा महत्त्वाची पदे भूषवलेले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post