जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग यांचे निधन

 


पुणे : जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र एकनाथ सरग (54 वर्षे) यांचे शनिवारी पहाटे उपचारादरम्यान ससून रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. गेल्या रविवारी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

सरग हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील होते. करिअरच्या सुरुवातीला त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक तरुण भारत मधून पत्रकारितेला सुरुवात केली होती. त्यानंतर राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची माहिती संचालनालयात नियुक्ती झाली.


गेल्या चार वर्षांपासून ते पुण्यात जिल्हा माहिती अधिकारी या पदावर होमाहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेत. कोरोनाच्या काळात लोकांपर्यंत जास्तीजास्त आणि योग्य माहिती पोहचवण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली होती. राज्याच्या विविध भागात त्यांनी काम केले आहे. मनमिळावू स्वभावाचे अधिकारी म्हणून ते परिचित होते. तसंच व्यंगचित्रकार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने शासकीय यंत्रणेला आणि पत्रकारिता क्षेत्राला धक्का बसला आहे.

Post a comment

0 Comments