सूफी संत अल्हाज हजरत सय्यदी पीर ऐनी शहा सहाब किब्ला ( रहे.) यांचा उरूस संपन्न.




पुणे : प्रसिद्ध सूफी संत अल्हाज हजरत  सय्यदी पीर ऐनी शहा सहाब किब्ला ( रहे.)  यांचा दिनांक 30.03.2021 रोजी पुणे भवानी पेठ येथील रोशन मस्जिद येथे साजरा करण्यात आला. उरूसाचे हे पाचवे वर्ष होते. हजरत किब्ला यांच्या उरुसा साठी  महाराष्ट्रातून त्यांचे शिष्य व खलिफा आले होते. तर विविध ठिकाणाहून मौला, मौलवी देखील आले होते. 

सायंकाळी सहानंतर सूफी संत अल्हाज हजरत  सय्यदी पीर ऐनी शहा सहाब किब्ला ( रहे.) यांच्या मजार शरीफ वर संदल लाऊन चादर, गिलाफ चढवण्यात आला. या नंतर हजरत किब्ला  यांचे जानसीन मौलाना शाह नजीरुद्दीन कादरी (मखदुमी शाह ) यांनी फातिहा देऊन सलाम पडून  सर्वांसाठी दुआ केली.

 सूफी संत हजरत ऐनी शाह सहाब किबला (रहे. ) उरुसाचे संपूर्ण नियोजन हजरत किब्ला यांचे जानशिन मौलाना शाह नजिरुद्दिन कादरी ( मखदुमी शाह ) यांचे मार्फत केले जाते. विशेष करून त्यांचे  महागुरू गौसवी शाह  सहाब  हैद्राबाद यांचे मार्फतच केले जाते. उपस्थितां साठी दुआ केली.सूफी संत हजरत ऐनी शाह सहाब किब्ला( रहे )  उरसाचे नियोजन हजरत किब्ला यांचे जानशीन  मौलाना शाह नजिरुद्दीन कादरी, शाह मोईनुद्दीन कादरी , शाह हबीबउद्दिन कादरी , शाह सुलतान शेख व हजरत किब्ला यांचे खलिफा , शिष्य या सर्वांनी विशेष  परिश्रम घेतले. या उसाच्या कार्यक्रमास पुणे शहरातील मेरा भारत टाइम्स चे संपादक उस्मान कादरी,  मौलाना दस्तगीर , सलीम शेख,  हैदर कादरी, अझहर कादरी , पत्रकार, समाज सेवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सदरचा कार्येक्रम मास्क व सोशल डिस्टंसिंग पाळूनच करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post