अर्चना जतकर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कडून अटक .



 पुणे : फौजदारी खटल्यात बाजूने निकाल लावून देत तो रद्द करण्यासाठी लाच मागितल्याच्या प्रकरणाशी संबंधीत महिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गुरूवारी दुपारी स्वतःच न्यायलायासमोर हजर झाल्या. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्यांना अटक केली.

अर्चना जतकर असे "एसीबी'ने ताब्यात घेतलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणात शुभावरी भालचंद्र गायकवाड (वय 29, रा. तळेगाव) या खासगी महिलेस "एसीबी'ने यापुर्वीच अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडगाव मावळ तालुक्‍यातील इंदुरी येथील 32 वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. तक्रारदार हे कडजई माता दूध संकलन मंडळाचे अध्यक्ष आहेत.दूध संकलन करून ते अमोल डेअरीला घालण्यात येत होते. दरम्यान, त्यांच्यात झालेल्या वादामुळे अमोल डेअरीने तक्रारदार व त्यांच्या भावाच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल केला होता.

दरम्यान, शुभावरी गायकवाड नावाच्या एका खासगी महिलेने तक्रारदाराशी संपर्क साधला. या प्रकरणामध्ये तुम्हाला आणि तुमच्या भावाला अटक होणार आहे. न्यायाधीशांना मॅनेज करून हे प्रकरण रद्द करून निकाल देण्यासंदर्भात गायकवाड हिने तक्रारदाराने सांगितले. तसेच तिने या कामासाठी तक्रारदाराकडे अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 50 हजार रुपये स्विकारताना गायकवाड हिला "एसीबी'च्या पथकाने 13 जानेवारीला हवेली तालुक्‍यातील किवळे येथे अटक केली होती. या गुन्ह्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी महिलेचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, जतकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. या घडामोडीनंतर जतकर या गुरूवारी दुपारी स्वतः न्यायालयात हजर झाल्या. त्यावेळी "एसीबी'ने त्यांना ताब्यात घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post