पुण्यामध्ये आता 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा, पुढील ७ दिवसांसाठी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार

 

पुणे : पुण्यामध्ये आता 'मिनी लॉकडाऊन'ची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात लॉकडाऊन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पुण्यामध्ये काही निर्बध लादण्यात पुढील ७ दिवसांसाठी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली.

विशेष म्हणजे गर्दी टाळण्यासाटी पीएमपी बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला पुणे शहराचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विरोध होता. मात्र शहरात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. शनिवारपासून नवे सर्व निर्णय लागू होणार आहेत.

तसेच, अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी असणार आहे. इतर सामाजिक कार्यक्रमांवर आठवडाभरासाठी बंदी असणार आहे. संचारबंदी काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू राहणार आहेत. अगोदर ठरलेल्या विवाहसमारंभासाठी केवळ ५० जणांना परवानगी असणार आहे. सर्व धार्मिक स्थळं, मॉल, थिएटर्स बंद असणार आहेत. अशी देखील माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

Post a comment

0 Comments