त्यामुळे लॉकडाउन करून फायदा नाही पुणे- कोरोनाचे निदान होणाऱ्या रुग्णांवर उपचारासाठी बेड आहेत. पुरेशी औषधे उपलब्ध आहेत. तसेच, आपल्या हातात कोरोना प्रतिबंधक लस देखिल आहे. त्यामुळे लॉकडाउन करून फायदा नाही, असे स्पष्ट मत सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. लॉकडाउन केल्याने रुग्णांची संख्या कमी होते, रुग्णांची संख्या जास्त दिवस कमी ठेवण्यात त्याची मदत होते. पण, लॉकडाउन केले नाही, तर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते. त्यानंतर काही दिवसांमध्ये ती कमी देखील होते. 

रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत.त्यांना अत्यावश्यक औषधांसाठी नातेवाइकांना शोधाशोध करावी लागत आहेत. अशी स्थिती असेल तर ही परिस्थिती सुधारण्यासाठी, आरोग्याच्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी वेळ आवश्यक असतो. त्या कालावधीत रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी लॉकडाउनचा पर्याय वापरला जातो, असे लॉकडाउन मागील शास्त्रीय कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

- कोरोनाबाधितांची संख्या रोजच्या रोज दहा-पंधरा हजारांपर्यंत वाढली- त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बेड उपलब्ध नसतील
- त्यांना देण्यासाठी औषधे नसतील किंवा लसही आपल्या हातात नसेल अशा वेळी रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी लॉकडाउन हा पर्याय वापरला जातो. सद्यःस्थितीत लसीकरणाला वेग आला आहे शहरात रोजच्या रोज दहा ते पंधरा हजार जण लस घेत आहेतत्यामुळे कोरोनाला प्रतिबंध करण्याची क्षमता या नागरिकांमध्ये   निर्माण होत आहे . लस घेऊनही काही जणांना कोरोना होतो. पण, त्याची तीव्रता ही निश्चित कमी राहाते रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची गरज कमी लागते. तो अत्यवस्थ होत नाही.

- घरात विलगिकरण करून त्याच्यावर उपचार सहजतेने करता येतात कोरोनाच्या सुमारे दहा टक्के रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागते. तेवढ्या प्रमाणात रुग्णांना उपचार देण्याची व्यवस्था आपल्याकडे असेल तर लॉकडाउन करून फायदा होणार नाही. पण, त्यापेक्षा रुग्णांची संख्या वाढली तर आरोग्य व्यवस्थेवर ताण येऊ नये, यासाठी लॉकडाउन करावे लागेल.

- डॉ. डी. बी. कदम

Post a comment

0 Comments