शिवाजीनगर येथील सीओइपी जंम्बो रुग्णालयामधील रुग्णांसाठी “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयु हेल्थ या नावाच्या आयुर्वेदिक तत्वयुक्त २५००० पाण्याच्या बाटल्या भेटसंपूर्ण जग कोरोनासारख्या भयंकर आजाराचा सामना करत आहे.सध्याचा काळ हा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आपली रोगप्रतिकार शक्ती वाढविणेकरिता “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयुहेल्थ नावाचे आयुर्वेदिक तत्वयुक्त पाणी तयार केले आहे.यामध्ये तुळस ही श्वसनाचा आजार बरा करण्यास मदत करते, सुंठ ही सर्दी आणि खोकल्यावर उपायकारक आहे, दालचिनी हि शरिरातील तापमान समतोल राखण्यास मदत करते, पिंपळी हि ताप, दमा यावरील उपचारास मदत करते, तर गुळवेल ही रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते आणि अश्वगंधा ही उर्जा आणि शक्ती वाढविण्यास मदत करते. असे सर्व घटक असलेले हे पाणी रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते म्हणुन “ऑक्सीकुल“ या ब्रँडने आयुहेल्थ या नावाच्या  आयुर्वेदिक तत्वयुक्त २५००० पाण्याच्या बाटल्या आज मा.डॉ.घनश्याम पांगती प्राध्यापक मेडीसीन विभाग लेडी हार्डीग मेडिकल कॉलेज, नवी दिल्ली आणि डॉ.जुगल किशोर प्राध्यापक व विभाग प्रमुख रोग प्रतिबंधक व सामाजिक औषध वैद्यक शास्त्र विभाग सफरदजंग रुग्णालय तथा वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज नवी दिल्ली यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आल्या. याप्रसंगी मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) रुबल अग्रवाल मा.उपायुक्त राजेंद्र मुठे, मा.सहाय्यक आरोग्य अधिकारी श्रीमती अंजली साबणे, महापालिका साय्य्क आयुक्त घोले रोड क्षेत्रीय कार्यलय श्रीमती आशा राऊत, श्री.निलेश शेळके, एम.डी. ऑक्सीकुल, श्री.विशाल शेळके, संचालक, मिलिंद शेळके, संचालक, जुगल किशोर आसवा सीईओ, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
प्र.माहिती व जनसंपर्क अधिकारी

   पुणे महानगरपालिका

Post a comment

0 Comments