आता कोरोनाचे चे काम एकाच डोस मध्ये होणार तमाम , लसी संदर्भात आता भारत सरकारशी चर्चा सुरू केल्याची माहिती



नवी दिल्ली - अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सनच्या एक डोसच्या लसीला फेब्रुवारीत परवानगी दिली होती. आतापर्यंत बाजारात आलेल्या सर्व लसी दोन डोसच्या असल्याने त्यात गोंधळाचाच भाग अधिक आहे. त्यामुळे एका डोसच्या लसीमुळे अनेक बाबतीत काम सुकर होउन क्‍लिष्टता टळणार आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर जॉन्सन अँड जॉन्सनने त्यांच्या लसी संदर्भात आता भारत सरकारशी चर्चा सुरू केल्याची माहिती आहे.

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची जॅन्सेन कोविड लस साध्या तापमानात साठवता येते. ही लस स्थानिक अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास वापरता येऊ शकते. सध्या कोविड विषाणूवर ऑक्‍सफर्ड विद्यापीठ व ऍस्ट्राजेनका कंपनीची एक लस उपलब्ध आहे.पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तिचे उत्पादन सुरू असून दुसरी लस भारत बायोटेकची असून ती कोव्हॅक्‍सिन नावाने दिली जाते आहे. ती भारताची स्वदेशी लस असून राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था व भारतीय वैद्यक संशोधन परिषद यांनी तयार केलेली आहे.


जॉन्सन अँड जॉन्सन ही जगातील एका बलाढ्य कंपनी असून शुक्रवारी याबाबत माहिती देताना कंपनीच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे, की जॅन्सेन कोविड लसीवर भारतात वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यावर सरकारशी चर्चा सुरू करण्यात आली आहे. त्यात इतर स्थानिक नियमनात्मक परवानग्यांचा समावेश असेल. चर्चा पूर्ण होउन परवानगी दिली गेली तर सगळेच काम वेगात होणार आहे. मध्यंतरी आरोग्य विभागानेही येत्या काही आठवड्यांत भारतात किमान सहा लसी उपलब्ध असतील असा दावा केला होता.

Post a Comment

Previous Post Next Post