फॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार.... डॉ.पी. ए. इनामदार यांची बैठकीत माहिती


पुणे : कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस  परिवार भरीव मदत करणार असून त्यासाठी  निधी संकलित केला जात असल्याची माहिती डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम महमद आझम एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट, डेक्कन मुस्लीम इन्स्टिट्यूट, अवामी महाज, गोल्डन ज्युबिली एज्युकेशन ट्रस्ट या संस्थांची बैठक बुधवारी आझम कॅम्पस येथे झाली. डॉ.पी. ए. इनामदार हे अध्यक्षस्थानी होते.

फॅशन स्ट्रीट जळीत ग्रस्तांची माहिती संकलित करून त्यांना भरीव मदत करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. त्यासाठी या संस्थांमध्ये निधी संकलन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. फॅशन स्ट्रीटवरील आग ही दुर्देवी घटना असून या व्यावसायिकांना जीवनात पुन्हा उभे करण्यासाठी आझम कॅम्पस शैक्षणिक, सामाजिक परिवार भरीव मदत करेल. पुणे शहरातील, देशातील प्रत्येक संकटात मदत करण्याची परंपरा आझम कॅम्पस सुरू ठेवेल, अशी भावना यावेळी डॉ.पी. ए. इनामदार यांनी व्यक्त केली.
Post a comment

0 Comments