कोरोनाची साखळी रोखायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत




महराष्ट्रात कोरोनाची दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. यामुळे भीषण परिस्थिती निर्माण होणार असून रुग्णसंख्येची साखळी तोडायची असेल तर काय निर्णय घ्यायचा याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. या बैठकीत राज्यात लॉकडाऊन अटळ आहे हे चर्चेअंती निष्पन्न झाले आहे.

हा लॉकडाऊन किती दिवसांचा असावा याचा निर्णय कोरोना टास्क फोर्सच्या बैठकीत घेतला जाईल. कोरोना रुग्णांचे जीव वाचवायचे असतील, वाढणारी रुग्णसंख्या रोखायची असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, कडक निर्बंध आणि थोडीशी सूट असे बिलकूल होणार नाही, असे बजावतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे तर काही काळासाठी कडक निर्बंध राज्यात कडक निर्बंध लादून विकेण्ड लॉकडाऊन या उपाययोजना केल्यानंतर लॉकडाऊनचा पुढील निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. तब्बल सवा दोन तास चाललेल्या या बैठकीत बैठकीत सर्व पक्षीय नेत्यांनी आपले मत मांडले. चर्चेत छोटे उद्योग, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांबाबत योग्य निर्णय घेण्याचे आवाहन करण्यात आले असून कोरोनाची साखळी रोखायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाले.

महामारीत कोणीही राजकारण करू नये - नाना पटोले

राज्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असून परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सरकारने सध्या विकेंड लॉकडाऊनसह काही कडक निर्बंध लावलेले आहेत. परंतु कोरोनाची साखळी तोडायची असेल तर आणखी कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी सरकार जो निर्णय घेईल त्याला सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

कडक निर्बंध अथवा लॉकडाऊनचा निर्णय घेतला तर तो नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनसारखा नसावा. रेमडिसेवीर इंजेक्शनची मागणी मोठया प्रमाणात होत असून राज्यातील रुग्णांना ते सहज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने आवश्यक त्या सर्व उपाय योजना कराव्यात अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.

नगर परिषद, पालिकेकडे ऑक्सिजन टँक उभारावेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक नगर परिषद क पालिकेकडे लिक्किड ऑक्सिजन साठा टेंक उभारण्यासाठी आकश्यक तो निधी देऊन तत्काळ कार्यकाही कराकी असे सुचकिले. नगरकिकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ऑक्सिजन कमतरता काढल्याने प्रश्न उद्भकले असून कडक निर्बंध लाकून रुग्ण काढ रोखाकी असे सांगितले. याकेळी किधान परिषद किरोधी पक्षनेते प्रकीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या सुचना मांडल्या. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, प्रधान सचिक आरोग्य डॉ प्रदीप क्यास. डॉ तात्याराक लहाने यांनी देखील किचार मांडले.

लोकांना आर्थिक पॅकेज द्या

मागील वर्ष लोकांसाठी अडचणीचं ठरलं आहे. अद्याप लोकं वीज बिल भरु शकले नाहीयेत. राज्यावरील कर्ज वाढत असेल तरी चालेल पण लोकांना आर्थिक पॅकेज द्या. जर पुन्हा लॉकडाउन झालं तर लोकांचा उद्रेक होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल तात्काळ दिले गेले पाहिजेत. खासगी रुग्णालयात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. राज्यात ऑक्सिजनची कमी आहे. रेमडेसिवीर लवकरात लवकर उपलब्ध केले पाहीजे. या सर्व बाबीत सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, असं देवेंद्र फडणवीसांनी या बैठकीत म्हटलं आहे.

कोरोना निर्बंध लावताना गरजू घटकांचाही विचार करावा

कोरोना रोखण्यासाठी निर्बंध लावताना समतोल असावा. निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. लॉकडाऊन लागू होणार असेल तर बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा. गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील, असे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबवावा लागेल

लॉकडाऊन जाहीर झाल्यास गरीब वर्गाला काय मदत देता येईल याबद्दल निर्णय घेतला पाहिजे. ऑक्सिजन संदर्भात नियमावली केली पाहिजे. काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टराचे मानधन कमी आहे. रेमडेसिवीरचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. काळाबाजार थांबवायला हवा, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

निर्बंध असले पाहिजेत पण सर्वसामान्य जनतेचा उद्रेकही लक्षात घ्यावा

कोरोनाचा उद्रेक किती दिवस राहील हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. कठोर निर्बंध लावावेत, मात्र जनता व व्यापाऱयांच्या भावनाही लक्षात घ्या. जनतेला आर्थिक पॅकेज दिलं गेलं पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

…तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल

कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील. रुग्णसंख्या इतक्या वेगाने वाढते आहे की, आज आपण लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला नाही तर उद्या आपोआपच लॉकडाऊनसारखी परिस्थिती उद्भवेल. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल.

ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जिवाला असले पाहिजे. सर्वपक्षीय नेत्यांना माझे आवाहन आहे की, राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन जो काही निर्णय घेतला जाईल त्याला आपले सहकार्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.

विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या सूचनांवर निश्चितपणे गांभीर्याने विचार केला जाईल, त्यांनी चांगल्या सूचना मांडल्या आहेत. विशेषतः रेमडीसिव्हीर उपलब्धता, चाचण्यांचे रिपोर्ट्स लवकर मिळणे, प्रयोगशाळाना यासाठी सूचना देणे, ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून काटेकोर नियोजन अशा त्यांच्या सूचनांवर शासन कार्यवाही करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

रुग्णांचे ट्रेसिंग करणे कठीण

गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यामुळे रुग्ण व रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे सोप्पे होते. आता जेव्हा की सर्व खुले झाले हे तेव्हा यात व्यावहारिक अडचणी येतात ते केंद्राने समजून घ्यावे. आपण हे सर्व काही करू पण या क्षणाला वेगाने वाढणारी रुग्णवाढ थांबवायची कशी हा प्रश्न असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

युवा पिढीला लस देण्याची गरज

एकीकडे लसीकरण वाढविण्याची खूप गरज आहे. युकेने दोन महिने आधीच कडक लॉकडाऊन केला पण त्या काळात मोठया प्रमाणात लसीकरण मोहीम राबवून नागरिकांना संरक्षित केले. आज युवा पिढीला लस देण्याची गरज आहे. फायझर कंपनी तर 12 ते 15 गटातील मुलांना लस देण्याचे नियोजन करत असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी निदर्शनास आणले.

गरीब, श्रमिक, हातावर पोट असणाऱयांचा विचार

कडक निर्बंध लावतांना गरीब, श्रमिक, हातावर पोट असणार्या वर्गाला त्रास होऊ नये हि सर्वांचीच भूमिका आहे. त्यादृष्टीने जरूर विचार झाला पाहिजे आणि केला जाईल, पण दररोज झपाटयाने वाढणारा संसर्ग आणि रुग्णवाढ काहीही करून प्रथम रोखणे अतिशय गरजेचे आहे. सर्वानुमते एकमुखाने निर्णय घेऊन या संकटावर मात कशी करावी ते ठरविले पाहिजे. यासाठी लोकांमध्ये आपण सर्व पक्षांनी जागृती केली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

कोरोनाविरोधात लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ सोसावीच लागेल

आज परिस्थिती बिकट बनत चालली आहे. टास्क फोर्सच्या तज्ञांचे म्हणणे देखील आम्ही सातत्याने विचारात घेत आहोत. एका बाजूला जनभावना आहे पण दुसर्या बाजूला कोरोनाचा उद्रेक आहे, अशा परिस्थितीत ही लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल. मी गेल्या काही दिवसांपासून विविध क्षेत्रातील लोकांशी बोलतो आहे, काल मी खासगी रुग्णालयांच्या संचालकांशी पण बोललो. राज्य शासनाला सहकार्य करण्याची सगळ्यांची तयारी आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

ब्रेक द चेन - 15 एप्रिलनंतर परिस्थिती गंभीर होईल

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा दिला आहे. सीताराम कुंटे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना कोरोना परिस्थितीचा अहवाल सादर केला. 15 एप्रिल ते 21 एप्रिलपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू शकतो. तसेच राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा आहे याकडेही त्यांनी लक्ष आहे, असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post