जवाहर साखर कारखान्याची ही निवड करण्यात आली.

 इचलकरंजी : यंत्राणे उसाची तोडणी केल्यानंतर वजावट करावयाच्या पाचटाचे वजन निश्चित करण्यासाठी शासनाने अभ्यास करण्यासाठी कमिटीची नेमणूक केली आहे. या कमिटी मार्फत राज्यातील पाच साखर कारखान्याची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी जवाहर साखर कारखान्याची ही निवड करण्यात आली आहे.

अ. लाट येते ऊस तोडणी यंत्राने ऊस कट करून जवाहर शेतकरी साखर कारखाना, हुपरी येथे पाला पाचोळा माती वेगळे करून यंत्राणे उसाची तोडणी केल्यानंतर वजावट करावयाच्या पाचटाचे वजन निश्चित करण्यात आले. 

यावेळी जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, तंज्ञ संचालक आमदार प्रकाशआण्णा आवाडे, केन कमिटीचे चेअरमन डॉ राहुल आवाडे साहेब, अभ्यास गटाचे अध्यक्ष व शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव डॉ. सुभाष घोडके, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापक संचालक संजय खरात, विशेष लेखा परीक्षक पि.ए मोहोळकर, कृषी अधिकारी महाराष्ट्र राज्य साखर संघ राजू गुंड, न्यू हॉलांड कंपनीचे प्रतिनिधी नितीन पाटील व सुशील कोले, कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी, चेअरमन बाबासाहेब चौगुले व संचालक शेतकरी उपस्थित होते

Post a comment

0 Comments