पुण्यातील प्रसिद्ध हॉकी प्लेयर विलियम मॅन्युअल डिसूजा राहणार खडकी बाजार यांचे अल्पशा आजाराने निधन.

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध हॉकी प्लेयर विलियम मॅन्युअल डिसूजा राहणार खडकी बाजार यांचे अल्पशा आजाराने आज 24 मार्च 2021 रोजी पिंपरी चिंचवड येथील सरकारी रुग्णालय वाय.सी.एम हॉस्पिटल मध्ये निधन झाले.त्यांचे मागे पत्नी व दोन मुली व आई असा परिवार आहे.

विलियम डिसोजा हे उत्कृष्ट व महाराष्ट्रातील नामवंत हॉकी प्लेयर होते गेल्या दहा वर्षाहून अधिक त्यांनी महाराष्ट्र हॉकीचे कोच म्हणून काम पाहिले आहे.तसेच खडकी येथील प्रियदर्शनी स्पोर्ट सेंटरचे ते मुख्य कोच होते.

त्यांच्या निगराणीखाली तयार झालेले अनेक हॉकी प्लेयर राज्य व नॅशनल लेवलवर त्यांनी रिप्रेझेंट केले आहे.पुण्यातील नामवंत हॉकी प्लेयर धनराज पिल्ले व विक्रम पिल्ले यासारखे अनेक खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिले.

अचानकपणे त्यांचा निधन झाल्याने खडकी भागातील अनेक खेळाडू व सामाजिक कार्यकर्त्यांना मोठा धक्का लागला आहे. सर्व समाज बांधव बरोबर चांगले संबंध असलेले नेहमी मुलांना खेळाच्या मैदानात प्रोत्साहन देणारा एक चांगला खेळाडू आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेक लोक त्या ठिकाणी व्यक्त करत होते.खडकी भागातील सर्व समाज बांधव खेळाडू व सामाजिक कार्यकर्ते मनीष आनंद,बिलियन गजभिये त्यांच्यासोबत असलेले शेकडो कार्यकर्ते अंत्यविधीला उपस्थित होते.विलियम मॅन्युअल डिसोजा यांचे अंत्यविधी युनायटेड इंडियन कब्रस्तान दापोडी येथे करण्यात आली.

अंत्यविधीची जबाबदारी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,साबीर शेख,अमजद शेख, इम्तियाज पटेल,आसिफ शेख, रियाज इनामदार,नदीम चौधरी या मुस्लिम बांधवांनी पार पाडली.

Post a comment

0 Comments