इचलकरंजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाणपोईचा शुभारंभ. ऑल इंडिया जैन कॉन्फरन्सचा उपक्ररम


इचलकरंजी/प्रतिनिधी -

भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक व परमपूज्य राष्ट्रसंत आचार्यश्री आनंदऋषिजी महाराज साब यांच्या जन्म जयंतीचे औचित्य साधत ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स यांच्या प्रेरणेतून येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात पाणपोईचा शुभारंभ प.पू. महासतीजी रिध्दिमाजी म.सा. यांच्या शुभ मांगलिक ने करण्यात आला. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते त्याचप्रमाणे तहानलेल्याला पाणी देणे हे पुण्यकर्म असल्याचे सांगत असे कर्म करत रहा असे आवाहन केले.

‘जल है तो कल है, कभी प्यासे को पानी पिलाया करो, बाद में अमृत पिलाने से क्या फायदा’ या काव्यपंक्तीप्रमाणे सदैव समाजसेवेसाठी अग्रेसर आचार्यश्री आनंद युवा मंच यांच्यावतीने आणि जतनजी मेहता यांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जात आहे. 

स्वागत व प्रास्ताविक प्रितम बोरा यांनी केले. पद्म खाबिया यांनी, मंडळ सदैव सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असून भविष्यातही चांगले कार्य करत रहा. समाज आपल्या पाठीशी  आहे, असे सांगितले. याप्रसंगी जीवनराज पुनमिया, दिलीप मुथा, भरत बोहरा, प्रकाश बोरा, संजय मुनोत, गुलाब कोठारी, ग्यानचंद जैन, महावीर बोरदिया, राजेंद्र बंब, प्रविण कांकरीया, घिसू पारख, सचिन मुथियान, राजू कांकलिया, अभिजीत पटवा, संदीप सुरपुरे, मनोज मुनोत, संजय गुगळे, नूतन मुथा आणि मंचचे राजू बोरा, दिनेश चोपडा, सुमतीलाल शहा, पंकज बाबेल, सुमित मुनोत, प्रफुल्ल बोरा, सुभाष गुगळे, संजय मुथा, योगेश भलंगट, शशिकांत भलंगट, रितेश चोपडा, लाभम भलंगट, जितेंद्र जैन आणि पत्रकार हुसेन कलावंत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post