कु. तेजाली चंद्रकांत रोहीदास यांना राष्ट्रीय आदर्श विद्यार्थींनी गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : 

          बेळगाव येथे सन्मानिय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अरविंद घट्टी, माजी कमांडर बेंगळोर  यांच्या अध्यक्षतेखाली नियाज हॉटेल हॉल बेळगाव येथे या कार्यक्रमाचे नियोजन करन्यात आले होते. विजयालक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कु. तेजाली रोहीदास यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ,फेटा देऊन राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानपुर्वक गौरव करण्यात आले. त्यावेळी कु. तेजाली चे आई वडील मा. चंद्रकांत रोहीदास व सौ. मुक्ताताई रोहीदास उपस्थित होते. यांना सुध्दा राष्ट्रीय आदर्श माता पिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

     त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा.सुमित्रा भोसले सामाजिक कार्यकर्ते कोल्हापूर, सौ.प्राजक्ता कोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा सांगली, पद्मजा खटावकर अभिनेत्री, बाळासाहेब उदगट्टी, सामाजिक कार्यकर्ते बेळगाव, मदन पलंगे, सिने अभिनेते कोल्हापूर, प्रा. प्रेमलाताई साळी, सामाजिक कार्यकर्ते मिरज, विनोद चितळे सामाजिक कार्यकर्ते एक्संबा, प्रसिद्ध निलायज्योती के.एस.आर.टी.सी.अधिकारी, संपत बोरगल सामाजिक कार्यकर्ते, सुरेश खोत चॉंद शिरदवाड ग्रा.पं.चेअरमन, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

   कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मा. विक्रम शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

Post a comment

0 Comments