भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वाशिम जिल्हाध्यक्षपदी फुलचंद भगत यांची नियुक्तीवाशिम:-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे आणी आपल्या लेखणीने जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडुन शासनदरबारी मांडुन न्याय मिळवुन देणारे सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांची त्यांच्या सामाजिक आणी शैक्षणिक कार्याची दखल घेवुन भारतीय विद्यार्थी संघटनेच्या वाशिम जिल्हाध्यक्ष पदी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष नितिन रमेश दोंदे यांनी नियुक्तीपञ देवून केली असुन अध्यक्ष व विदर्भ विभाग अध्यक्षा विद्या शिंगाडे यांच्या नेतृत्व आणी मार्गदर्शनात संघटनेचे ध्येयधोरणे आणी संघटन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे फुलचंद भगत यांनी या नियुक्तीबद्दल मत व्यक्त केले.

             शिका, संघटीत व्हा, संघर्ष व्हा या महापुरुषांच्या विचारधारेनुसार भारतीय विद्यार्थी संघटना मार्फत विद्यार्थी व पालक वर्गास योग्य ते न्याय मिळवून देण्याच्या प्रयत्न करणे, विद्यार्थी, पालक वर्ग, जागृत नागरीक मिळून संघटन तयार करुन विद्यार्थीचा उज्वल भविष्यासाठी,शिक्षणाचा दर्जा उंचाण्यास सर्वतोपरी प्रयत्न करणे,केजी पासुन तर पिजि पर्यतच्या सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देन्यासाठी लढणे,शासकिय शाळा,महाविद्यालये,शिक्षण क्षेञातील सर्व स्तरावर सर्वतोपरी शिक्षणाचा दर्जा ऊंचावन्यासाठी तसेच विद्यार्थी वर्गाच्या ऊज्वल भविष्यासाठी प्रयत्न करणे आधी ध्येयधोरण घेवुन भारतीय विद्यार्थी संघटना राष्टीय स्तरावर काम करत आहे.सामाजीक आणी शैक्षणीक कार्याची दखल घेवुन संघटनेचे महाराष्ट प्रदेश अध्यक्ष नितीन दोंदे यांनी फुलचंद भगत यांची वाशिम जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.या नियुक्तीमुळे भगत यांचे सर्वस्तरातुन कौतुक होत असुन सर्व क्षेञातील मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.संघटन वाढीसाठी आणी विद्यार्थी हित जोपासुन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यातील अडिअडचनी आणी समस्या सोडवन्यासाठी सदैव तत्परतेने प्रयत्न करणार असल्याचे मत या नियुक्तीवर फुलचंद भगत यांनी व्यक्त केले.

Post a comment

0 Comments