पंचगंगा नदीचे वाढते प्रदुषण रोखण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
 इचलकरंजी : पंचगंगा नदीचे वाढते प्रदुषण,  रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना या संदर्भात शहरातील सीईटीपीचे पदाधिकारी व प्रोसेसधारकांची ताराराणी पक्ष कार्यालय येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.

 यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी आवश्यक त्या उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे सांगत त्यासाठी शासन पातळीवरुन आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही दिली.यावेळी ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, कामगार नेते शामराव कुलकर्णी, सीईटीपीचे संदीप मोघे, गिरीराज मोहता आदींसह प्रोसेसधारक उपस्थित होते

Post a comment

0 Comments