गरिबांचे थेट वीज कनेक्शन कट, मात्र ऊर्जामंत्र्याच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च...



मुंबई - सर्वसामान्य जनता करोनाच्या निर्बंधांबरोबर वाढत्या महागाईला तोंड देत असताना थकीत विज बिलासाठी मदत मिळेल अशी आशा सरकारने दाखवली. मात्र, त्यावर सरकारने घोर निराशाच केली. काही हप्ते करून विजबील भरण्यास मुभा देणे गरजेचे असताना थेट कनेक्‍शन कट केली जात आहेत. तर दुसरीकडे मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयांवर कोट्यावधींचा खर्च होत असल्याचा आरोप भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख विश्वास पाठक यांनी केला आहे. .



सरकारकडे पैसे नाही म्हणतात, गरीब शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापतात, करोना योध्यांना पगार देत नाही मात्र ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सरकारी ऑफिस व बंगल्यावर जाऊन पहा कसे पैसे उधळतात, अशा टीका विश्वास पाठक यांनी केली आहे.दरम्यान, लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून होत आहे. तर दुसरीकडे थकबाकी न भरल्यास महावितरणने वीज जोडणी तोडण्याचा सपाटा लावला आहे. यात अनेकवेळा नागरिक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादविवाद होत आहेत. कर्मचाऱ्यांवर हल्ले देखील झाले आहेत.

Post a comment

0 Comments