वाहिफणी कामगाराला अज्ञातांनी मारहाण करून त्याचा मृतदेह संगमनगर येथील एका मोकळ्या जागेत टाकल्याची घटना घडली , एका रेकॉर्डवरील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले

इचलकरंजी : 
 एका वाहिफणी कामगाराला अज्ञातांनी  मारहाण करून त्याचा मृतदेह संगमनगर येथील एका मोकळ्या जागेत टाकल्याची घटना घडली. अलिम गदवाल (वय 40, रा. डॉ. लांडे हॉस्पिटलजवळ, इचलकरंजी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका रेकॉर्डवरील संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी रात्री तारदाळ मधील संगमनगर येथील एका धाब्यासमोर घडली. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

पार्वती इंडस्ट्रिज समोरील संगमनगर येथे कोल्हापूरी धाब्याजवळ एका युवकाचा मृतदेह पडल्याचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास निदर्शनास आले. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव मृत व्यक्ती इचलकरंजी येथील असून त्याच्या पाठीवर आणि कमरेवर जबरी मार दिल्याचे दिसून येत होते. जबरी मारहाणीमुळे त्याच्या पृष्ठभागावर प्रचंड व्रण होते. घटनास्थळी डीवायएसपी बी. बी. महामुनी यांनी भेट दिली. मृत अलिम सोमवारी रात्री अज्ञातांनी मारहाण करण्याची धमकी दिली होती. किरकोळ सायकल चोरी प्रकरणातून त्यास जबरी मारहाण केल्याने तो गतप्राण झाल्याची चर्चा घटनास्थळी होती. संशयित मारेकर्‍यांना पकडण्यासाठी गुप्त पथके रवाना केली आहेत. घटनास्थळी अलिमच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता..

Post a comment

0 Comments