मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणाऱ्या रिझवीवर कारवाई करण्याची मानवत येथील मुस्लिम बांधवाची मागणी
ॲकर  - इस्लाम धर्माच्या पवित्र अशा कुरआनमध्ये बदल करून त्यातील २६ आयात वगळा अशी मागणी करून देशातील तमाम मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखविणाऱ्या वसीम रिझवी विरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवुन कारवाई करावी अशी मागणी मानवत येथील मुस्लिम बाधव याच्या वतीने  निवेदनाद्वारे  तहसीलदार  मार्फत राष्ट्रपती याना करण्यात आली आहे.

 दि.११ मार्च  रोजी लखनौ  उत्तरप्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुरआन मध्ये बदल करुन त्याच्यात असलेले आयात मधुन एकुण २६ आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली. सुप्रिम कोर्ट रिझवीची ही याचिका दाखल न करता फेटाळून लावेल अशी अपेक्षा आम्हाला आहे.  मात्र वसीम रिजवी याने याचिका दाखल केल्या नंतर माध्यमांना बोलतांना कुरआन व इस्लाम धर्माचे सुरवातीचे तीन खालीफा विरुध्द अनेक खोटे व बीनबुडाचे आरोप केले आहेत. त्याच्या वक्तव्यामुळे इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. इतर धर्माच्या लोकांमध्येही अशी चुकीची माहिती गेल्यामुळे इस्लाम धर्मा बाबत इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवी याने केले आहे. इस्लाम धर्माच्या भावना दुखविणाऱ्या वसीम रिजवी विरुध्द भा.द.वि. कलम २९५ व आयटी एक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला कठोर कारवाई करावी  अशी मागणी मानवत येथील मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली आहे . या निवेदनावर हबीब भडके, समाजसेवक नूर भाई कुरेशी, हाफीज अकबर, नियामत खान, शेख मुस्ताक अल्लाहरख्खां , काजी असलम, एजाज खान, मोईन कुरेशी, युसूफ ताबोळी आदीच्या  स्वाक्षर्‍या आहेत.

 मानवत प्रतिनीधी  अहमद अन्सारी मानवत.ता.मानवत.जि.परभणी मो न 7218275486.                 9970852315.

Post a comment

0 Comments