मोटारसायकलस्वाराने दिलेल्या धडकेत वृध्दा ठार.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पट्टणकोडोली येथील शालाबाई पांडूरंग बाचणकर (वय 85) ह्या शुक्रवार (दि.02) रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घरा शेजारील रस्ता क्रॉस करत असताना तेथून जात असलेल्या एका मोटारसायकल  स्वाराने दिलेल्या धडकेत जखमी झाल्या होत्या.त्यांना उपचारासाठी पट्टणकोडोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते तेथे उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.तेथे उपचार चालू असताना  शनिवार (दि.03 मे ) रोजी सकाळी अकराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्यांच्या पश्च्यात दोन मुले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post