डॉ प्रविण निचत यांना राष्ट्रीय आरोग्य रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..बदलापुर येथील निसर्ग उपचार तज्ञ डॉ प्रविण निचत ह्यानी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत नॅशनल यूथ अवॉर्डी  फेडरेशन ऑफ इंडिया व डॉ विशाखा सोशल वेल्फेअर फाऊंडेशन नवी दिल्ली च्या वतीने सोमवार दिनांक 15 मार्च 2021 रोजी, प्रेस हॉल, न्यू महाराष्ट्र भवन, नवी दिल्ली येथे ग्लोबल यूथ पीस  कॉनक्लेव 2021, नॅशनल कॉन्फरन्स ऑन आत्मनिर्भर भारत ह्या कार्यक्रमात  राष्ट्रीय आरोग्य रत्न पुरस्कार  डॉ प्रविण निचत ह्याना मा.श्री भीकुरामजी ईदाते, (दादा ईदाते) चेयरमैन नॅशनल कमिशन डिनोटिफाईड नोमॅडिक अँड सेमी नोमॅडिक ट्राइब, गवर्नमेंट ऑफ इंडिया ह्यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला आहे.  डॉ प्रविण हे निसर्गोपचार तज्ञ आहे ते शतायुषी निसर्ग उपचार केंद्र मुंबई व होप फाऊंडेशन मुंबई तर्फे समाज सेवेचे काम करीत आहेत. 

 हा  पुरस्कार त्यांना  त्यांच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमांसाठी मिळालेला आहे. तो उपक्रम असा की ते वैद्यकीय मध्ये निसर्गोपचार चा प्रचार व प्रसार करण्यासाठी सर्वाना मोफत टेलिफोनद्वारे सर्वच रोगांवर "घरगुती उपाय" सांगतात. त्याचे ते एकही रुपया आकारत नाही. अशी ही त्यांची आगळी वेगळी समाज भक्ति व निस्वार्थ भावनेने केलेले समाजकार्य गेले कित्येक वर्षांपासून करत आहेत. जवळपास 35,000 पेक्षा जास्त रुग्णांचे उपचार करून आरोग्य निरसन केले आहे. त्यांच्या रुग्णांपैकी काही सीने स्टार,(नट व नट्या) न्यायाधीश, जेलर, पुलिस ऑफिसर, डॉक्टर्स, पत्रकार, शिक्षक व इतर बरेच रुग्ण आहेत. चरक, धन्वन्तरि, मदर टेरेसा असे जवळपास 90 विशेष पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यामध्ये विविध संस्था त्यांचे आरोग्यशिबिर आयोजित करतात.

Post a comment

0 Comments