आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज मध्ये महिला दिन कार्यक्रमात अनुभव कथनपुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज मध्ये महिला दिन कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनींचे अनुभव कथन   आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पुणे विभागाच्या सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.अध्यक्ष स्थानी आबेदा इनामदार असणार आहेत . 

 प्राचार्य शाहीन शेख,उप प्राचार्य  गफार सय्यद यांनी ही माहिती दिली. ८ मार्च रोजी गुगल मीट द्वारे  कार्यक्रम सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे. डॉ अझमत दलाल,सबिहा  शेख ,रुखसार माईणकर ,शेरवानी नागरे ,स्वलेहा इनामदार ,सारिया अन्सारी ,इरम काची ,बुशरा  शेख ,प्रियाशा मोहिते अनुभव कथन करणार आहेत .


Post a comment

0 Comments