नुक्लियस क्रिकेट लीग स्पर्धा उत्साहात संपन्न, माय लोगो संघ विजयीइचलकरंजी - नुक्लीयस ग्राफिक्सतर्फे ऑफिसमधील कर्मचार्‍यांसाठी रविवार दिनांक 7 मार्च 2021 रोजी कॅबसन हॉटेल शेजारील 7 स्टार क्लब टर्फ ग्राऊंडवर भव्य क्रिकेट लीग स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. विक्रांत  भांबूरे यांच्या हस्ते फीत कापून झाले. या स्पर्धेत क्रिएटिविटो, माय साईन, माय लोगो व माय इंप्रेशन हे 4 संघ सहभागी झाले होते. पहिल्या सामन्यात क्रिएटिविटो संघावर विजय मिळवून माय लोगो संघ अंतिम सामन्यात दाखल झाला. तर दुसर्‍या सामन्यात माय इंप्रेशन संघाने माय साईन संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात माय लोगो संघाने माय इंप्रेशन संघाला 6 षटकात 63 धावांचे आव्हान दिले. पण अटीतटीच्या या सामन्यात माय इंप्रेशन संघाचे 53 धावत सर्व गडी बाद झाले. माय लोगो संघ 9 धावांनी विजय मिळवून नुक्लीयस क्रिकेट लीगच्या पहील्या सिजनचा मानकरी ठरला. सिकंदर मोमीन मालिकावीरचा मानकरी ठरला. सामन्यांचे पंच म्हणून कपिल काजवे यांनी काम पाहिले. 

नुक्लीयस ग्राफिक्सचे सीईओ श्री. सुनील मांडवकर व सौ. निलिमा मांडवकर यांनी कर्मचर्‍याना उत्साहित करण्यासाठी ठेवलेली ही स्पर्धा कौतुकास्पद असल्याचे एमडी मुकुन्द धुळाराव यांनी शेवटी सांगितले. यावेळी राजेश गाडवे, पूजा गाडवे, पूजा काजवे, प्रसन्न पाटील, किर्तीकुमार भांबुरे, राहुल पाटील, सिकंदर मोमीन, निखिल जवळकर, नेहा उकिरडे, अविनाश हावळे, कांतीनाथ तेरदाळे, दिगंबर पाटील, अनिल बेडकिहाळे, प्रज्वल मांगलेकर, धीरज कमते,  श्रीकांत, सिध्दु, संजय कांबळे, वसिम सज्जापुरे, वसिम पट्टणकुडी, गौस लोदे,विक्रम परीट, आकाश कोरवी, विजय कारवेकर, हर्षद, चिंदके मामा, प्रेक्षक व नुक्लियस परिवार उपस्थित होता.

Post a comment

0 Comments