lइचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने स्व. बाळासाहेब चिवटे यांना विनम्र अभिवादन     इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने आज बुधवार दि. ३ मार्च  रोजी इचलकरंजी शहराचे पहिले  नगराध्यक्ष स्व. बाळासाहेब चिवटे यांच्या पुण्यतिथी निमित्त  नगरपरिषद सभागृहा मध्ये त्यांच्या प्रतिमेस नगराध्यक्षा ॲड. अलका स्वामी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. 

              याप्रसंगी आरोग्य सभापती संजय केंगार, उपमुख्याधिकारी केतन गुजर,कामगार अधिकारी विजय राजापुरे, लेखापाल कलावती मिसाळ,जल अभियंता अंकिता मोहिते,आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, शाखा अभियंता सुभाष देशपांडे,महिला बाल कल्याण विभाग प्रमुख सीमा धुमाळ,स्वच्छता निरिक्षक कल्पना देसाई, महादेव मिसाळ, भारत कोपार्डे आदि उपस्थित होते.Post a comment

0 Comments